mr_tw/bible/names/engedi.md

2.0 KiB

एन-गेदी

व्याख्या

एन-गेदी हे यहुदाच्या वाळवंटात यरुशलेमच्या दक्षिणपूर्व शहराचे नाव होते.

  • एन-गेदी हे मृत समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित होते.
  • त्याच्या नावाचा एक भाग म्हणजे "झरा," ह्याचा संदर्भ पाण्याच्या झाऱ्याशी आहे जो, शहरामधून वाहत जाऊन समुद्राला मिळतो.
  • एन-गेदी हे त्याच्यामध्ये असलेल्या द्राक्षमळ्यासाठी आणि सुपीक जमिनीसाठी प्रसिद्ध होते. कदाचित सततच्या वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यामुळे हे असावे.
  • एन-गेदीमध्ये मजबूत किल्ले होते, जेथे दावीद पळून गेला, जेंव्हा शौल राजाने त्याचा पाठलाग केला.

(हे सुद्धा पहा: दावीद, वाळवंट, झरे, यहूदा, विश्रांती, मृत समुद्र, शौल, मजबूत किल्ला, द्राक्षांचा वेल)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: