mr_tw/bible/names/judah.md

2.5 KiB

यहूदा

तथ्य:

यहूदा हा याकोबाच्या मोठ्या मुलांपैकी एक होता. लेआ त्याची आई होती. * त्याच्या वंशजांना "यहूदाचे गोत्र" असे म्हंटले जाते.

  • तो यहुदाच होता, ज्याने त्याच्या भावांना, त्यांचा छोटा भाऊ योसेफ ह्याला मरण्यासाठी खोल खड्ड्यात सोडून देण्याऐवजी त्याला विकण्यास सांगितले.
  • दावीद राजा आणि त्याच्यानंतरचे सर्व राजे हे यहूदाचे वंशज होते. येशू हा सुद्धा यहुदाचा वंशज होता.
  • जेंव्हा शलमोनाची कारकीर्द संपली, तेंव्हा इस्राएलाचे राष्ट्र विभागले गेले, आणि यहूदाचे राज्य हे दक्षिणेकडील राज्य होते.
  • नवीन करारांतील प्रकटीकरणाच्या पुस्तकात, येशूला "यहुदाचा सिंह" असे म्हंटले गेले आहे.
  • "ज्यु" आणि "यहुदिया" हे शब्द "यहूदा" या नावापासून आले आहेत.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: याकोब, ज्यु, यहूदा, यहुदिया, इस्राएलाचे बारा गोत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: