mr_tw/bible/other/12tribesofisrael.md

2.9 KiB

इस्राएलाचे बारा गोत्र, इस्राएलाच्या मुलांचे बारा गोत्र, बारा गोत्र

व्याख्या:

"इस्राएलाचे बारा गोत्र" या शब्दाचा अर्थ, याकोबाच्या बारा मुलांना आणि त्यांच्या वंशजांना सूचित करते.

  • याकोब हा अब्राहामाचा नातू होता. नंतर देवाने याकोबाचे नाव इस्राएल असे ठेवले.
  • त्या गोत्रांची नावे पुढीलप्रमाणे: रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, दान, नफताली, गाद, आशेर, इस्साखार, जबुलून, योसेफ आणि बन्यामीन.
  • लेवीच्या वंशजांना कनानमध्ये कोणत्याही जमिनीचा वारसा मिळाला नाही कारण ते देव आणि देवाच्या लोकांची सेवा करण्याकरिता वेगळे केलेले याजकांचे ते वंशज होते.
  • योसेफाला जमिनीचा दुहेरी वारसा मिळाला, जो कि त्याच्यानंतर एफ्राइम आणि मनश्शे या त्याच्या दोन पुत्रांना मिळाला.
  • पवित्र शास्त्रामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे बारा गोत्रांच्या नावाच्या यादीमध्ये थोडासा फरक आहे. कधीकधी लेवी, योसेफ किंवा दान ह्यांना यादीतून काढण्यात आले आहे आणि कधी कधी योसेफच्या दोन पुत्रांना एफ्राईम आणि मनश्शे ह्यांना यादीत सामावून घेतले आहे.

(हे सुद्धा पहा: वारसा, इस्राएल, याकोब, याजक, वंश)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: