mr_tw/bible/names/saul.md

3.6 KiB

शौल (जुना करार)

तथ्य:

शौल हा इस्राएली मनुष्य होता, ज्याला देवाने इस्राएलाचा पहिला राजा होण्यासाठी निवडले.

  • शौल उंच आणि देखणा, आणि शक्तिशाली सैनिक होता. इस्राएल लोकांना जसा राजा हवा होता, तो तश्या प्रकारचा मनुष्य होता,
  • जरी त्याने सुरवातीला देवाची सेवा केली, पण नंतर शौल गर्विष्ठ बनला आणि त्याने देवाची अवज्ञा केली. ह्याचा परिणाम म्हणून, देवाने दाविदाला शौलाच्या जागी राजा म्हणून नेमले आणि शौलाला युद्धात ठार मरण्याची परवानगी दिली.
  • नवीन करारामध्ये, तिथे एक शौल नावाचा यहुदी होता, त्याला पौल या नावाने देखील ओळखले जाते आणि जो नंतर येशू ख्रिस्ताचा प्रेषित बनला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: राजा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 17:01 शौल इस्त्रायलचा पहिला राजा होता. इस्राएल लोकांना पाहिजे तसाच तो सुंदर व ऊंच होता. इस्त्राएलावर काही वर्षे शौल राजाने चांगले राज्य केले. * परंतु नंतर तो एक दुष्ट राजा बनला व त्याने देवाची आज्ञा मानली नाही, म्हणून देवाने त्याच्या जागी राज्य करण्यासाठी दुस-या मनुष्यास नेमले.

  • 17:04 लोक दाविदाची प्रशंसा करत असेलेले पाहूण शौलाला त्याचा हेवा वाटू लागला. शौलाने अनेकदा त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण दाविदाने स्वत:स शौलापासून लपविले.

  • 17:05 शेवटी, शौल युद्धात मरण पावला आणि दाविद इस्त्रायलाचा राजा झाला.

  • Strong's: H7586, G4549