mr_tw/bible/other/rest.md

5.1 KiB

विसावा, स्थापित (स्थिरावणे), विसावा घेतला, विश्राम, अस्थिर

व्याख्या:

"विसावा" या शब्दाचा शब्दशः अर्थ आराम घेण्यासाठी किंवा पुन्हा ताकद प्राप्त करण्यासाठी कार्य करणे थांबवणे असा होतो. "उर्वरित" या वाक्यांशाचा संदर्भ काहीतरी उरलेल्याशी आहे. एक "विसावा" म्हणजे काम थांबवणे.

  • एखादी वस्तू तेथे "विसावा घेत आहे" ह्याचा अर्थ ती वस्तू तेथे "उभी" किंवा "बसलेली" आहे असा होतो.
  • एक जहाज जे कुठेतरी "विसाव्याला येते" म्हणजे ते तेथे "थांबले" किंवा "स्थावर" झालेले आहे.
  • जेंव्हा एखादा व्यक्ती किंवा प्राणी विसावतो, तेंव्हा ते स्वतःला ताजे करण्यासाठी बसतात किंवा आडवे होतात.
  • देवाने इस्राएलांना आठवड्याच्या सातव्या दिवशी विश्रांती घेण्याची आज्ञा दिली. या काम न करण्याच्या दिवसाला "शब्बाथ" असे म्हंटले गेले.
  • एखादी वस्तू कश्यावर तरी विसाव्यास ठेवणे, ह्याचा अर्थ ती वस्तू त्याच्यावर "ठेवणे" किंवा "मांडणे" असा होतो.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "विसावा (स्वतःला) देणे" ह्याचे भाषांतर "काम थांबवणे" किंवा "स्वतःला ताजेतवाने करणे" किंवा "ओझी वाहण्याचे थांबवणे" असे केले जाऊ शकते.
  • एखादी वस्तू कश्यावर तरी "विसाव्यास" ठेवणे, ह्याचे भाषांतर ती वस्तू त्याच्यावर "ठेवणे" किंवा "मांडणे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा येशूने म्हंटले "मी तुम्हाला विसावा देईन" ह्याचे भाषांतर "मी तुम्हाला तुमचे ओझे वाहणे बंद करण्यास कारणीभूत होईन" किंवा "मी तुम्हाला शांतीने राहण्यास मदत करीन" किंवा "मी तुम्हाला आराम आणि माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी सक्षम करीन" असे केले जाऊ शकते.
  • देव बोलला, "ते माझ्या विसाव्यात येणार नाहीत" आणि या वाक्याचे भाषांतर "ते माझ्या विसाव्याच्या आशीर्वादाचा अनुभव करणार नाहीत" किंवा "माझ्यावर विश्वास ठेवण्यापासून जो आनंद आणि शांतीचा येते त्याचा अनुभव ते घेणार नाहीत" असे केले जाऊ शकते.
  • "उर्वरित" या शब्दाचे भाषांतर "राहिलेले ते सर्व" किंवा "इतर सर्व लोक" किंवा "बाकी राहिलेले सर्व काही" असे होऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अवशेष, शब्बाथ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: