mr_tw/bible/other/fountain.md

2.4 KiB

कारंजे (झरा, उगमस्थान), झरा, झरे, वाहणारा झरा

व्याख्या:

"कारंजे (झरा)" आणि "झरा" या शब्दाचा सहसा संदर्भ मोठ्या प्रमाणातील पाण्याशी आहे, जे नैसर्गिकरीत्या जमिनीमधून वाहते.

  • पवित्र शास्त्रामध्ये या शब्दांचा उपयोग लाक्षणिक अर्थाने, देवापासून वाहणारे आशीर्वाद ह्याच्या संदर्भात किंवा असे काहीतरी जे स्वच्छ करते आणि शुद्ध करते ह्याच्या संदर्भात केला जातो.
  • आधुनिक काळात, एक झरा हा बऱ्याचदा मानवनिर्मित वस्तू असते, ज्यामधून पाणी बाहेर वाहते, जसे पाणी पिण्याचा झरा. * या शब्दाच्या भाषांतराचा संदर्भ, वाहत्या पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोताशी येतो, ह्याची खात्री करा.
  • या शब्दाच्या भाषांतराची, "महापूर" हा शब्द कसा भाषांतरित केला आहे, ह्याच्याशी तुलना करा.

(हे सुद्धा पहा: महापूर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: