mr_tw/bible/other/flood.md

4.6 KiB

महापूर, पूर, भरून टाकले, पुरामुळे, पुराचे पाणी

व्याख्या:

"महापूर" या शब्दाचा शब्दशः संदर्भ मोठ्या प्रमाणातील पाण्याशी आहे, जे संपूर्ण जमिनीला व्यापून टाकते.

  • या शब्दाचा लाक्षणिक अर्थाने उपयोग कशाच्यातरी जबरदस्त प्रमाणाचा, विशेषकरुन अचानक घडणाऱ्या काही गोष्टींसाठी केला जातो.
  • नोहाच्या काळात, लोक इतके वाईट झाले होते की, देवाने जगभर महापूर आणला ज्याने सर्व पृथ्वीचा पृष्ठभाग, अगदी पर्वतांची शिखरे देखील व्यापून टाकली. जो नोहाबरोबर तारुमध्ये नव्हता, असा प्रत्येकजण बुडाला. इतर सर्व पुरामुळे खूप लहान जमीन व्यापली जाते.
  • हा शब्द एक क्रिया देखील असू शकतो, जसे की, "जमीन नदीच्या पाण्याने भरून गेली."

भाषांतर सूचना

  • "महापूर" या शब्दाचे शब्दशः भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "भरून वाहणारे पाणी" किंवा "मोठ्या प्रमाणातील पाणी" ह्यांचा समावेश होतो.
  • "महापुराप्रमाणे" ही लाक्षणिक तुलना शब्दशः शब्दास ठेवू शकत नाही, किंवा त्याऐवजी पर्यायी शब्दाचा उपयोग केला जाऊ शकतो, ज्याचा संदर्भ अशी गोष्ट ज्याचे वाहते स्वरूप आहे अशा वास्तूशी आहे, जसे की नदी.
  • "महापुरातील पाण्याप्रमाणे" या अभिव्यक्तीमध्ये जिथे आधीपासूनच पाण्याचा उल्लेख केलेला आहे, तिथे "महापूर" या शब्दाचे भाषांतर "जबरदस्त प्रमाणात" किंवा "भरून वाहणारे" असे केले जाऊ शकते.
  • या शब्दाचा एक रूपक म्हणून सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो, जसे की, "या पुराने मला साफ करू देऊ नका" ह्याचा अर्थ "मला या प्रचंड संकटांचा सामना करावयास लावू नका" किंवा "मला या आपत्तींमुळे उध्वस्त होऊ देऊ नको" किंवा "तुझ्या क्रोधामुळे माझा नाश होऊ देऊ नको" असा होतो. (पहा: रूपक
  • "मी अश्रूंनी माझ्या अंथरुणावर पूर आणतो" या लाक्षणिक अभिव्यक्तीचे भाषांतर "माझे अश्रू माझ्या अंथरुणावर पुराच्या पाण्याप्रमाणे वाहतात" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: तारू, नोहा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: