mr_tw/bible/other/stronghold.md

4.3 KiB

किल्ला, (तटबंदी) मजबूत नगरे, तटबंदी, तटबंदीच्या, गढ, दुर्ग

व्याख्या:

"किल्ला" आणि "तटबंदी" या दोन्ही शब्दांचा संदर्भ अशा ठिकाणाशी आहे, जी शत्रू सैन्याच्या हल्ल्यापासून व्यवस्थित संरक्षण करू शकतील. "गढ (भक्कम)" हा शब्द एखाद्या शहराचे किंवा अशा ठिकाणाचे वर्णन करतो, ज्याला हल्ल्यापासून सुरक्षित केले होते.

  • बऱ्याचदा "मजबूत नगरे" आणि "दुर्ग" या बचावात्मक भिंतींसह मानवनिर्मित रचना होत्या. ते नैसर्गिक संरक्षणात्मक अडथळ्यांची ठिकाणे असू शकतात, जसे खडकाळ डोंगराच्या कडा किंवा उंच पर्वत.
  • लोकांनी नगरच्या संरक्षणासाठी तटबंदीच्या भिंती किंवा इतर रचना बांधल्या, जेणेकरून शत्रुंसाठी त्यांना तोडणे कठीण झाले.
  • "किल्ला" किंवा "गढ" ह्याचे भाषांतर "सुरक्षित मजबूत ठिकाण" किंवा "अत्यंत सुरक्षित ठिकाण" असे केले जाऊ शकते.
  • "तटबंदीचे नगर" ह्याचे भाषांतर, "सुरक्षितपणे संरक्षित शहर" किंवा "मजबूत बांधलेले शहर" असे केले जाऊ शकते.
  • या शब्दाचा लाक्षणिक अर्थाने उयपोग जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी त्याला किल्ला किंवा दुर्ग म्हणून संदर्भित करण्यासाठी केला गेला आहे. (पहा: रूपक)
  • "किल्ला" या शब्दाचा अजून एक लाक्षणिक अर्थाचा संदर्भ एखाद्या गोष्टीशी आहे, ज्यावर एखाद्याने सुरक्षेसाठी चुकीचा विश्वास ठेवला, जसे की, खोटे देव किंवा यहोवा सोडून उपासना करण्यात येणाऱ्या इतर गोष्टी. याचे भाषांतर "खोटे गढ" म्हणून केले जाऊ शकते.
  • या शब्दाचे भाषांतर "आश्रय" यापासून वेगळे असावे, ज्यात तटबंदी होण्याच्या संकल्पनेपेक्षा सुरक्षिततेवर अधिक जोर दिला जातो.

(हे सुद्धा पहा: खोटे देव, खोटे देव, आश्रय, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: