mr_tw/bible/names/obadiah.md

3.7 KiB

ओबद्या

तथ्य:

ओबद्या हा जुन्या करारातील संदेष्टा होता, ज्याने अदोमाच्या लोकांच्याविरुद्ध भविष्यवाणी केली, जे एसवाचे वंशज होते. जुन्या करारामध्ये ओबद्या नावाची आणखी पुष्कळ माणसे होती:

  • ओबद्याचे पुस्तक हे जुन्या करारातील सर्वात लहान पुस्तक आहे, आणि ते ओबद्याला देवाकडून मिळालेल्या दर्शनामधील भविष्यवाणीबद्दल सांगते.
  • ओबद्या केंव्हा जगला आणि त्याने केंव्हा भविष्यवाणी केली हे स्पष्ट नाही. ते कदाचित यहोराम, अहज्या, योवाश, आणि अथल्या हे यहुदामध्ये राज्य करत असलेल्या काळामध्ये असावेत. दानीएल, यहेज्केल, आणि यिर्मिया हे संदेष्ट्ये देखील त्याच काळात भविष्यवाणी करत असावेत.
  • ओबेद्या सुद्धा कदाचित त्याच्या नंतरच्या काळात जगला असावा, सिद्कीया राजाच्या आणि बाबेलाच्या बंदिवासाच्या काळात.
  • इतर मनुष्य ज्याचे नाव ओबद्या आहे, ज्यामध्ये एसावच्या वंशजांचा समावेश आहे,; एक गादी जे दाविदाचे अंगरक्षक बनले, अहाब राजाच्या राजवाड्यातले व्यवस्थापक, यहोशाफाट राजाचे शासकीय लोक, योशीया राजाच्या काळात एक मनुष्य ज्याने मंदिर दुरुस्त करण्यास मदत केली, आणि नहेम्याच्या काळात एक लेवी, जो पहारेकरी देखील होता.
  • ओबेद्या पुस्तकाचा लेखक या मनुष्यांपैकी एक असावा, असे असू शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: अहाब, बाबेल, दावीद, अदोम, एसाव, यहेज्केल, दनीएल, देव, यहोशाफाट, योशीया, लेवी, शौल, सिद्कीया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: