mr_tw/bible/names/babylon.md

5.7 KiB

बाबेल, बाबेलास, बाबेली

तथ्य:

बाबेल हे शहर बाबेलच्या प्राचीन भागाची राजधानी होते, जे बाबेल साम्राज्याचा भाग होते.

  • बाबेल हे फरात नदीच्या किनाऱ्यावर वसलेले शहर होते. शेकडो वर्षापूर्वी याच भागात बाबेलचा बुरूज बांधला गेला होता.
  • कधीकधी "बाबेल" हा शब्द संपूर्ण बाबेल साम्राज्याला सूचित करतो. उदाहरणार्थ, "बाबेलच्या राजाने" केवळ बाबेल शहरावर नव्हे तर संपूर्ण साम्राज्यावर राज्य केले.
  • बाबेलाचे लोक शक्तिशाली लोक होते ज्यांनी यहूदाच्या राज्यावर आक्रमण केले आणि 70 वर्षांपर्यंत लोकांना बाबेलमध्ये बंदिवान म्हणून ठेवले.
  • या प्रांताच्या भागाला "खास्द्यांचा देश" आणि तिथल्या लोकांना "खास्दी" म्हणून ओळखण्यात आले. याचा परिणाम म्हंणून "खास्दी" हा शब्द वारंवार बाबेलला संदर्भित किंवा सूचित करण्यासाठी वापरला जातो. (पहा: सिनेकडॉक
  • नवीन करारामध्ये, "बाबेल" हा शब्द कधीकधी मूर्तीपूजक व इतर पापी वर्तणुकीशी संबंधित असलेली ठिकाणे, लोक आणि विचारशील तत्वांचा उल्लेख करण्यासाठी रूपक म्हणून वापरला जातो.
  • "मोठी नगरी बाबेल" किंवा "बाबेलचे पराक्रमी शहर" हा वाक्यांश प्राचीन शहर बाबेल सारख्याच मोठ्या, समृद्ध आणि पापी अशा एखाद्या शहरासाठी किंवा राष्ट्रासाठी रूपक अर्थाने सूचित करण्यासाठी वापरले जाते. (पहा: रूपक

(हे सुद्धा पहा: बाबेल, खास्दी, यहूदा, नबुखद्नेस्सर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 20:06 सुमारे 100 वर्षांनंतर जेंव्हा अश्शूराने इस्त्राएल राज्याचा नाश केला, तेंव्हा देवाने यहूदाच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी नबूखद्नेस्सर हया बाबेलच्या राजास पाठविले. बाबेल हे एक शक्तिशाली राष्ट्र होते.

  • 20:07 परंतु काही वर्षांनंतर यहूदाच्या राजाने बाबेल विरुध्द बंड पुकारले. म्हणून बाबेलच्या लोकांनी परत येऊन यहूदाच्या राज्यावर चढाई केली. त्यांनी यरुशलेम शहर ताब्यात घेतले, मंदिराचा नाश केला व शहरातील व मंदिरातील सर्व संपती घेऊन गेले.

  • 20:09 नबुखद्नेस्सर व त्याच्या सैनिकांनी यहूदाच्या राज्यातील जवळ जवळ सर्वच लोकांना बाबेलमध्ये आणले केवळ फार गरीब इस्त्रायल लोकांनाच शेती करण्यासाठी मागे ठेवले.

  • 20:11 त्यानंतर सुमारे सत्तर वर्षांनी पारसाचा राजा कोरेश हयाने बाबेलचा पराभव केला

  • Strong's: H3778, H3779, H8152, H894, H895, H896, G897