mr_tw/bible/names/babel.md

2.5 KiB

बाबेल

तथ्य:

मेसोपोटेमियाच्या दक्षिणेच्या भागात शिनार नावाच्या एका क्षेत्रामध्ये बाबेल हे एक प्रमुख शहर होते. शिनारला नंतर बाबेल असे संबोधले गेले.

  • बाबेलचे नगर हे हामचा नातू निम्रोद याने स्थापन केले, त्याने शिनार या भागावर राज्य केले.
  • शिनारचे लोक गर्विष्ठ झाले आणि त्यांनी स्वर्गात पोहोचण्यासाठी उंच बुरुज बांधण्याचा निर्णय घेतला. नंतर त्याला "बाबेलचा बुरुज" म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • कारण बुरुज बांधणाऱ्या लोकांनी परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे सगळीकडे पसरण्यास नकार दिला, देवाने त्यांचे बोलणे एकमेकांना समजू नये म्हणून त्यांच्या भाषेचा घोटाळा केला. यामुळे त्यांना पृथ्वीवरील अनेक ठिकाणी राहायला जाणे भाग पडले.
  • "बाबेल" या शब्दाचा मूळ अर्थ "गोंधळ (घोटाळा)" आहे, तेथे परमेश्वराने लोकांच्या भाषेमध्ये घोटाळा केला त्यावरून हे नाव त्या ठिकाणाला पडले आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाबेल, हाम, मेसोपोटामिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: