mr_tw/bible/names/esau.md

4.2 KiB

एसाव

तथ्य:

इसहाक आणि रिबका ह्याच्या जुळ्या मुलांपैकी एसाव हा एक होता. तो त्या दोघांमधील पहिला जन्मणारा होता. याकोब हा त्याचा जुळा भाऊ होता.

  • कटोराभर अन्नासाठी एसावाने त्याचा जेष्ठत्वाचा हक्क याकोबाला विकला.
  • कारण एसाव हा प्रथम जन्मलेला होता, म्हणून त्याचे पिता इसहाक ह्याने त्याला विशेष आशीर्वाद देणे गरजेचे होते. परंतु इसहाकाने तो आशीर्वाद एसवाऐवजी याकोबाला देण्यासाठी त्याने त्याला फसवले. सुरवातीला एसाव हा याकोबावर इतका रागावला होता की, तो त्याला मारून टाकू इच्छित होता, पण नंतर त्याने त्याला माफ केले.
  • एसावाला अनेक मुले आणि नातवंडे होती, आणि या वंशजांनी कनानच्या भूमीत राहत असताना एक मोठा लोकसमूह स्थापन केला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अदोम, इसहाक, याकोब, रिबका)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 06:07 जेंव्हा रिबकेच्या मुलांचा जन्म झाला, तेंव्हा पहिला तांबूस वर्णाचा असून त्याचे सर्व अंग केशवस्त्रासारखे होते, त्याचे नांव एसाव ठेवले.

  • 07:02 अशा प्रकारे एसावाने याकोबाला आपला ज्येष्ठत्वाचा (मोठ्या मुलाचा) हक्क देऊन टाकला.

  • 07:04 जेंव्हा इसहाकाने शेळीच्या केसास स्पर्श केला व त्याच्या कपड्यांचा वास घेतला, तेंव्हा तो एसावच आहे असे वाटून त्याने त्यास आशीर्वाद दिला.

  • 07:05 एसाव याकोबाचा द्वेष करू लागला कारण याकोबाने त्याचा जेष्ठत्वाचा अधिकार आणि आशीर्वाद सुदधा चोरला होता.

  • 07:10 परंतु एसावाने अगोदरच याकोबास क्षमा केली होती, आणि त्यांना एकमेकांना भेटून आनंद झाला.

  • Strong's: H6215, G2269