mr_tw/bible/names/levite.md

2.6 KiB

लेवी, लेवीनी

व्याख्या:

लेवी हा याकोबाच्या किंवा इस्राएलाच्या बारा मुलांपैकी एक होता. "लेवी" या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी येतो, जो इस्राएलाच्या लेवी गोत्राचा वंशज आहे.

  • मंदिराची काळजी घेणे आणि धार्मिक विधी आयोजित करणे, ज्यामध्ये बलिदान आणि प्रार्थना अर्पण करणे ह्यांचा समावेश होता, या जबाबदाऱ्या लेवींच्या होत्या.
  • सर्व यहुदी याजक हे लेवी होते, जे लेवीचे वंशज आणि लेवी गोत्राचा एक भाग होते. (तथापि, सर्व लेवी याजक नव्हते.)
  • लेवी याजाकाला बाजूला वेगळे करून त्याला मंदिरामध्ये देवाची सेवा करण्यासाठी समर्पित केले जात होते.
  • "लेवी" नावाचे दोन इतर मनुष्य, हे येशूचे पूर्वज होते, आणि त्यांची नावे लुककृत शुभवर्तमान या पुस्तकाच्या वंशावळीत आढळतात.
  • येशूचा' शिष्यः मत्तय ह्याला सुद्धा लेवी म्हणून संबोधले जात होते.

(हे सुद्धा पहा: मत्तय, याजक, बलिदान, मंदिर, इस्राएलाचे बारा गोत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: