mr_tw/bible/other/serpent.md

3.8 KiB

सर्प, साप, विषारी साप

तथ्य:

या सर्व शब्दांचा संदर्भ एका प्रकारच्या सरपटणाऱ्या प्राणाशी येतो, जो लांब असतो, ज्याचे शरीर पातळ आणि ज्याचा जबडा मोठा आणि विषारी दात असतात, आणि जो जमिनीवर मागे पुढे घसरत हालचाल करतो. "सर्प" हा शब्द सहसा मोठ्या सापाला संदर्भित करण्यासाठी, आणि "विषारी साप" हा शब्द अशा प्रकारच्या सापाला संदर्भित करतो ज्याच्याकडे विष आहे आणि त्याचा उपयोग तो त्याच्या भक्ष्याला विष देऊन मारण्यासाठी करतो.

  • या प्राण्याचा उपयोग लाक्षणिक अर्थाने अशा व्यक्तीसाठी केला जातो, जो दुष्ट आहे, विशेषकरून असा एखादा जो कपटी आहे.
  • येशूने धार्मिक पुढाऱ्यांना "विषारी सापाच्या पिल्लांनो" असे म्हंटले, कारण ते नीतिमान असल्याचा आविर्भाव आणत होते, पण ते लोकांना फसवत होते, आणि त्यांना वेगळी वागणूक देत होते.
  • एदेनाच्या बागेमध्ये, शैतानाने सर्पाचे रूप धारण केले, जेंव्हा तो हव्वेशी बोलला आणि त्याने तिला देवाची आज्ञा मोडण्यासाठी प्रभावित केले.
  • हव्वेला सर्पाने पाप करण्यासाठी प्रभावित केल्यानंतर, आणि हव्वा आणि तिचा नवरा ह्यांनी पाप केल्यानंतर, देवाने सापाला असे बोलून शाप दिला की, इथूनपुढे सर्व साप जमिनीवर सरपटत चालतील, ह्याचा अर्थ असा होतो की, त्याच्या आधी त्यांना पाय होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: शाप, फसवणे, अवज्ञा, एदेन, दुष्ट, संतान, भक्ष्य, शैतान, पाप, प्रभावित)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: