5.1 KiB
5.1 KiB
परीक्षा (भुरळ पाडणे), मोह
व्याख्या:
एखाद्याला परीक्षेत पाडण्यासाठी, त्या व्यक्तीला काहीतरी चुकीचे करण्याची आवश्यकता आहे.
- एक मोह म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी चुकीचे करण्याची इच्छा असणे.
- लोक त्यांच्या स्वत:च्या पापमय स्वभावामुळे आणि इतर लोकांच्याद्वारे मोहात पडले जातात.
- सैतान लोकांना चुकीच्या गोष्टी करून देवाची आज्ञा मोडण्यास व देवाविरुद्ध पाप करण्यास मोहात पडतो.
- सैतानाने येशूला मोहात पाडण्याचा आणि त्याने काहीतरी वाईट करावे म्हणून प्रयत्न केला, पण येशूने सैतानाच्या सर्व मोहांचा प्रतिकार केला आणि त्याने कधीच पाप केले नाही.
- "देवाला परीक्षेत पाडणारा" असा कोणीतरी जो, त्याने काहीतरी चुकीचे करावे म्हणून प्रयत्न करीत नाही, तर, त्याला शिक्षा करून देवाने त्याला प्रतिसाद द्यावा या पातळीपर्यंत तो अवज्ञेच्या हट्टीपणात जातो. याला "देवची परीक्षा बघणे" असेही म्हणतात.
भाषांतर सूचना
- "भुरळ पाडणे" या शब्दाचे भाषांतर "पाप करण्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडणे" किंवा "मोहात पाडणे" किंवा "पाप करण्याची इच्छा निर्माण करण्यास कारणीभूत होणे" असे केले जाऊ शकते.
- "मोह" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "मोहक गोष्टी" किंवा "एखाद्याला पाप करण्यासाठी मोहात पडणाऱ्या गोष्टी" किंवा "अशा गोष्टी ज्यामुळे काहीतरी चुकीचे करण्याची इच्छा निर्माण होते" असे केले जाऊ शकते.
- "देवाची परीक्षा घेणे" ह्याचे भाषांतर "देवाची परीक्षा बघणे" किंवा "देवाची परीक्षा" किंवा "देवाची सहनशीलता बघणे" किंवा "देवाने शिक्षा द्यावी म्हणून कारणीभूत होणे" किंवा "हट्टीपणाने देवाची आज्ञा मोडत राहणे" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: अवज्ञा, सैतान, पाप, परीक्षा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 थेस्सलनीकाकरांस पत्र 03:4-5
- इब्री 04:14-16
- याकोबाचे पत्र 01:12-13
- लुक 04:1-2
- लुक 11:3-4
- मत्तय 26:39-41
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
25:01 तेव्हा सैतानाने तेथे येऊन येशूची परीक्षा पाहिली.
-
25:08 अशा प्रकारे येशू सैतानाच्या मोहाला बळी पडला नाही, म्हणून सैतान त्याला सोडून तेथून निघून गेला.
-
38:11 शिष्यांनी परिक्षेत पडू नये म्हणून येशूने त्यांना प्रार्थना करावयास सांगितले.
-
Strong's: H974, H4531, H5254, G551, G1598, G3985, G3986, G3987