5.7 KiB
5.7 KiB
शाप, शापित, अनादर, शाप देणे
व्याख्या:
"शाप" या शब्दाचा अर्थ, ज्या व्यक्तीला किंवा वस्तूला शाप दिला आहे, त्या बरोबर नकारात्मक गोष्टी घडण्यास कारणीभूत होये असा होतो.
- एक शाप हे एखाद्याला किंवा एखाद्या गोष्टीला हानी होईल असे एक वाक्य असू शकते.
- एखाद्याला शाप देणे, हे त्यांच्याबरोबर वाईट गोष्टी घडण्याच्या इच्छेची अभिव्यक्ती असू शकते.
- ह्याचा संदर्भ शिक्षेशी किंवा इतर नकारात्मक गोष्टी ज्या एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो ह्याच्याशी आहे.
भाषांतर सूचना
- या शब्दाचे भाषांतर "वाईट गोष्टी घडण्यास भाग पडणे" किंवा "च्य बरोबर काहीतरी वाईट घडेल ह्याची घोषणा करणे" किंवा "च्या बरोबर वाईट गोष्टी घडवून आणण्याची शपथ घेणे" असे केले जाऊ शकते.
- देव त्याची अवज्ञा करणाऱ्या लोकांवर शाप सोडतो ह्याच्या संदर्भात, ह्याचे भाषांतर "वाईट गोष्टी घडू देऊन शिक्षा करणे" असे केले जाऊ शकते.
- "शापित" हा शब्द, जेंव्हा लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो, तेंव्हा त्याचे भाषांतर "(हा व्यक्ती) खूप मोठय संकटांचा अनुभव करेल" असे केले जाऊ शकते.
- "शाप दिला" या वाक्यांशाचे भाषांतर "(या व्यक्तीने) मोठ्या समस्यांचा अनुभव करावा अशी इच्छा करणे" असे केले जाऊ शकते.
- "जमीन शापित आहे" या वाक्यांशाचे भाषांतर "जमीन खूप सुपीक नाही" असे केले जाऊ शकते.
- "मी जन्मलो तो दिवस शापित असो" ह्याचे भाषांतर "मी इतका दुःखी आहे की, मी जन्मलो नसतो तर बरे झाले असते" असे केले जाऊ शकते.
- तथापि, जर प्रकल्पित भाषेत "शाप दिला" हा वाक्यांश आहे, आणि त्याचा सुद्धा तोच अर्थ आहे, तर तोच वाक्यांश वापरणे चांगले राहील.
(हे सुद्धा पहा: आशीर्वाद)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 शमुवेल 14:24-26
- 2 पेत्र 02:12-14
- गलतीकरांस पत्र 03:10-12
- गलतीकरांस पत्र 03:13-14
- उत्पत्ति 03:14-15
- उत्पत्ति 03:17-19
- याकोबाचे पत्र 03:9-10
- गणना 22:5-6
- स्तोत्र 109:28-29
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
02:09 देव सर्पास बोलला, “तू शापीत झाला आहेस !
-
02:11 म्हणून जमिन शापित झाली आहे, आता तूला कष्ट करुनच अन्न मिळेल.
-
04:04 तुला जे आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन व तुला जे शाप देतील त्यांना मी शाप देईन.
-
39:07 तेंव्हा पेत्राने शपथ घेऊन म्हटले, ‘जर मी हया मनुष्यास ओळखत असेल तर देव मला शापित करो!’’
-
50:16 आदाम आणि हव्वेने देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे पाप या जगात आले व देवाने त्याचा नाश करण्याचा निर्णय घेतला.
-
Strong's: H422, H423, H779, H1288, H2763, H2764, H3994, H5344, H6895, H7043, H7045, H7621, H8381, G331, G332, G685, G1944, G2551, G2652, G2653, G2671, G2672, G6035