mr_tw/bible/other/newmoon.md

2.2 KiB

नवचंद्रदर्शन

व्याख्या:

"नवचंद्रदर्शन" या शब्दाचा संदर्भ चंद्राशी येतो, जेंव्हा तो एक लहान चंद्रकोर आकाराच्या चांदीच्या प्रकाशासारखा दिसतो. सूर्यास्ताच्या वेळी, पृथ्वीच्या सभोवती त्याच्या कक्षेत येण्याआधीची ही चंद्राची सुरवातीची अवस्था आहे. ह्याचा संदर्भ अमावास्येनंतरच्या काही दिवसांनी पुन्हा पहिल्यांदा नवीन चंद्र दिसण्याशी सुद्धा येतो.

  • प्राचीन काळात, नवचंद्रदर्शन हे विशिष्ट कालावधीच्या, जसे की, महिन्याच्या सुरवातीचे प्रतिक मानले जात होते.
  • इस्राएली लोकांनी चंद्रदर्शनाचा सण साजरा केला, जो मेंढ्याचे शिंग फुंकून चिन्हित केला जात होता.
  • पवित्र शास्त्र या वेळेला "महिन्याची सुरवात" असे देखील संद्रभित करते.

(हे सुद्धा पहा: महिना, पृथ्वी, सण, शिंग, मेंढरू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: