mr_tw/bible/other/sheep.md

4.7 KiB
Raw Permalink Blame History

मेंढी, मेंढ्या, एडका (मेंढा), एडके (मेंढे), मेंढरू, मेंढवाडा, मेंढवाड्यांच्या, मेंढरांची लोकर कातरणारे, मेंढ्यांचे कातडे

व्याख्या:

एक "मेंढरू" हे एक मध्यम आकाराचे प्राणी आहे, ज्याचे चार पाय असतात, आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर लोकर असते. एक नर मेंढराला "एडका" असे म्हंटले जाते. एक मादी मेंढराला "मेंढी" असे म्हंटले जाते. "मेंढरू" चे अनेकवचन रूप हे "मेंढरू" असेच होते.

  • एक लहान मेंढीला "कोकरू" असे म्हंटले जाते.
  • इस्राएली लोक सहसा बलिदानासाठी मेंढरांचा उपयोग करत, विशेषकरून नर आणि तरुण मेंढरू.
  • लोक मेंढरांपासून मिळणारे मास खात होते, आणि त्याच्या लोकरीचा उपयोग कपडे आणि इतर वस्तू बनविण्यासाठी करत होते.
  • मेंढरे ही खूप विश्वसनीय, दुबळी, आणि भित्री असतात. ती भटकवण्यासाठी सहज प्रभावित केली जाऊ शकतात. त्यांचे नेतृत्व करण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना अन्न, पाणी आणि निवारा पुरविण्यासाठी, त्यांना एका मेंढपाळाची गरज असते.
  • पवित्र शास्त्रामध्ये, लोकांची तुलना मेंढरांशी केलेली आहे, जिथे देव त्यांचा मेंढपाळ आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: इस्राएल, कोकरा, बलिदान, मेंढपाळ)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 09:12 एके दिवशी मेंढरे चारत असतांना, मोशेने एक झुडूप जळत असतांना पाहिले.

  • 17:02 दाविद हा बेथलेहेम नगरातील एक मेंढपाळ होता. आपल्या पित्याची मेंढरे चारीत असताना दाविदाने अनेकदा मेंढरांवर हल्ला करणा-या सिंह व अस्वलास जीवे मारिले होते.

  • 30:03 येशूला, हा समुदाय मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखा दिसून आला.

  • 38:08 येशू म्हणाला, ‘‘आज रात्री तुम्ही सर्व मला सोडून जाल. असे लिहिले आहे की, मी मेंढपाळास मारीन व मेंढरांची दाणादाण करीन.

  • Strong's: H352, H1494, H1798, H2169, H3104, H3532, H3535, H3733, H3775, H5739, H5763, H6260, H6629, H6792, H7353, H7462, H7716, G4165, G4262, G4263