mr_tw/bible/other/festival.md

2.7 KiB

सण

व्याख्या:

समान्यपणे, सण हा एक उत्सव आहे जो एका समुदायाच्या लोकांच्याद्वारे भरवला जातो.

  • जुन्या करारामध्ये "सण" या शब्दाचा शब्दशः अर्थ "नियुक्त केलेला काळ" असा होतो.

  • इस्राएली लोकांच्याकडून साजरे केले गेलेले सण हे विशिष्ठरित्या नियुक्त केलेला काळ किंवा हंगाम होता, ज्याला देवाने, इस्राएली लोकांना त्याचे निरीक्षण करावयास सांगितले होते.

  • काही इंग्रजी भाषांतरामध्ये, सण या शब्दाच्या जागी "मेळा" या शब्दाचा उपयोग केला आहे, कारण उत्सव करण्यामध्ये एकत्र येऊन मोठे जेवण एकत्रित करण्याचा समावेश होतो.

  • तेथे अनेक मुख्य सण होते, ज्यांना इस्राएली लोक दरवर्षी साजरे करत होते:

    • वलहांडण
    • बेखमीर भाकरीचा सण
    • प्रथमफळ
    • सप्ताहांचा सण (पेन्टेकॉस्ट)
    • तुतारीचा सण
    • पश्चात्तापाचा दिवस
    • तम्बुंचा सण
  • या सणांचा हेतू हा होता की, लोकांनी देवाचे आभार मानावे आणि त्याने त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सोडवण्यासाठी, वाचवण्यासाठी, पुरवण्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांची आठवण करावी.

(हे सुद्धा पहा: मेळा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: