mr_tw/bible/other/horn.md

3.5 KiB

शिंग, शिंगे

तथ्य:

शिंगे हे कायमचे, कठीण टोकदार वध आहेत, जे अनेक प्रकारच्या प्राण्यांच्या डोक्यावर येतात, ज्यामध्ये गुरेढोरे, मेंढरू, शेळी, आणि हरिण ह्यांचा समावेश होतो.

  • मेंढ्याचे शिंग (नर मेंढी) ह्याच्यापासून एका संगीत वाद्याला बनवले जाते, त्याला "एडक्याच्या शिंगाचा कर्णा" किंवा "शोफार" असे म्हंटले जाते, आणि त्याला धार्मिक उत्सवासारख्या विशेष उत्सवामध्ये वाजवले जाते.
  • देवाने इस्राएली लोकांना शिंगाच्या-आकाराचा प्रक्षेप धूप आणि पितळेच्या वेदींच्या चारही कोपऱ्यांवर बनवायला सांगितले. जरी त्या प्रक्षेपांना "शिंगे" असे म्हंटले गेले, तरी ते प्रत्यक्षात प्राण्यांचे शिंग नव्हते.
  • "शिंग" या शब्दाचा उपयोग काहीवेळा "चंबू" या शब्दाला संदर्भित करण्यासाठी केला जातो, ज्याचा आकार शिंगासारखा असतो आणि त्याचा उपयोग पाणी किंवा तेल धरून ठेवण्यासाठी होतो. तेलाच्या शिंगाचा उपयोग राजाला अभिषेकित करण्यासाठी, जसे शमुवेलाने दाविदाला केले, त्यासाठी केला जात होता.
  • या शब्दाचे भाषांतर, कर्णा या शब्दाला संदर्भित करणाऱ्या शब्दापेक्षा वेगळ्या अशा शब्दाने केले पाहिजे.
  • "शिंग" या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने, सामर्थ्य, सत्ता, अधिकार, आणि राजपद ह्यांचे प्रतिक म्हणून सुद्धा केला जाऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: अधिकार, गाय, हरिण, शेळी, सत्ता, शाही, मेंढी, कर्णा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: