mr_tw/bible/other/goat.md

4.2 KiB

शेळी, शेळ्या, तहशाची कातडी, बळीचा बकरा, कोकरू

व्याख्या:

एक शेळी ही मध्यम-आकाराची, चार पायांचा प्राणी आहे, जो मेंढरासारखाच आहे आणि त्याला मुख्यत्वेकरून त्याच्या दुधासाठी आणि मांसासाठी वाढवले जाते. शेळीच्या बाळाला "कोकरू" असे म्हंटले जाते.

  • मेंढराप्रमाणेच, शेळी सुद्धा बलिदानासाठी लागणारा महत्वाचा प्राणी होता, विशेषकरून वल्हांडणात.

  • जरी शेळी आणि मेंढरू हे खूप एकसारखे आहेत, तरी पुढे काही मार्ग आहेत ज्यानुसार ते वेगळे आहेत:

    • शेळ्यांना खडबडीत केस असतात; तर मेंढरांना लोकर असते.
    • शेळीचे शेपूट वर उभे असते, तर मेंढराचे शेपूट खाली लटकलेले असते.
    • मेंढराला सहसा त्याच्या कळपाबरोबर राहायला आवडते, पण शेळ्या या जास्त स्वतंत्र असतात आणि त्यांच्या कळपापासून दूर फिरण्याकडे त्यांचा ओढा असतो.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, शेळ्या हे इस्राएलमध्ये दुध मिळवण्याचा मुख्य स्त्रोत होत्या.

  • शेळ्यांच्या कातडीचा उपयोग तंबू झाकण्यासाठी आणि द्राक्षरस ठेवण्यासाठी पिशव्या बनवण्यासाठी केला जात होता.

  • जुना आणि नवा करार दोन्हीमध्ये, शेळ्यांचा उपयोग कदाचित त्यांची काळजी घेणाऱ्यापासून दूर राहाण्याची त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे, अधर्मी लोकांच्या चिन्हादाखल केला जात होता.

  • इस्राएल लोक सुद्धा शेळ्यांचा उपयोग चिन्हादाखल पाप धारक म्हणून करत असत. जेंव्हा एका शेळीचे बलिदान केले जायचे, तेंव्हा याजक त्याचे हात दुसऱ्या जिवंत शेळीवर ठेवायचे, आणि त्या शेळीला चिन्हादाखल लोकांचे पाप धारण करणारा प्राणी म्हणून वाळवंटामध्ये सोडून देत होते.

(हे सुद्धा पहा: कळप, बलिदान, मेंढरू, धार्मिक, द्राक्षरस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: