mr_tw/bible/other/wine.md

4.2 KiB
Raw Permalink Blame History

द्राक्षरस, बुधला, नवीन द्राक्षरस

व्याख्या:

पवित्र शास्त्रात, "द्राक्षरस" हा शब्द द्राक्षे नावाच्या फळाच्या रसातून बनविलेले एक प्रकारचे आंबलेले पेय आहे. द्राक्षरस हा "बुधल्यामध्ये" साठवले जात होते, जे प्राण्यांच्या त्वचेपासून बनविलेले पात्र होते.

  • "नवीन द्राक्ष" हा शब्द नुकताच द्राक्षातून काढलेल्या आणि अजून न आंबलेल्या रसाला संदर्भत करतो. कधीकधी "द्राक्षरस" हा शब्द न आंबलेल्या द्राक्षाच्या रसाला संदर्भित केला जातो.
  • द्राक्षरस तयार करण्यासाठी, द्राक्षांना द्राक्षकुंडात जाते जेणेकरून रस बाहेर येईल. रस शेवटी आंबतो आणि त्यात मद्यार्क तयार होतो.
  • पवित्र शास्त्रात जेवणासह द्राक्षरस हे सामान्य पेय होते. त्यामध्ये सध्याच्या द्राक्षरसात असते तेवढे मद्यार्क नव्हते.
  • जेवणासाठी द्राक्षरस देण्यापूर्वी ते बऱ्याचदा पाण्यात मिसळले जात असे.
  • जुन्या आणि ठिसूळ असलेल्या बुधल्याला चिर पडत असे, ज्यामुळे द्राक्षरस गळत असे. नवीन बुधले मऊ आणि लवचिक होते, याचा अर्थ असा की ते सहजपणे फाटत नसे आणि द्राक्षरस सुरक्षितपणे साठवू शकत असे.
  • जर द्राक्षसर आपल्या संस्कृतीत अज्ञात असेल तर त्याचे भाषांतर "आंबलेला द्राक्षाचा रस" किंवा "द्राक्ष नावाच्या फळापासून बनलेले आंबलेले पेय" किंवा " फळांचा आंबलेला रस" असे म्हणून केले जाऊ शकते. (पाहा: [अज्ञात कसे भाषांतरित करावे]
  • "बुधला" भाषांतरित करण्याच्या मार्गांमध्ये "द्राक्षरसाची पिशवी" किंवा "प्राण्याच्या चमडीची द्राक्षाची पिशवी" किंवा "द्राक्षरसासाठी प्राण्यांच्या कातडीचे पात्र" या वाक्यांचा समावेश असू शकतो.

(हे देखील पाहा: [द्राक्ष], [द्राक्षवेल], [द्राक्षीचा मळा], [द्राक्षकुंड])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [1 तीमथ्याला पत्र 05:23]
  • [उत्पत्ति 09:21]
  • [उत्पत्ति 49:12]
  • [योहान 02: 3-5]
  • [योहान 02:10]
  • [मत्तय :17: १]
  • [मत्तय 11:18]

तोडले

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 2561, एच 2562, एच 3196, एच 4469, एच 4997, एच 5435, एच 6025, एच 6071, एच 8492, जी 1098, जी 3820, जी 3943