mr_tw/bible/other/royal.md

2.8 KiB

शाही (राजाला शोभणारा), राजपद

व्याख्या:

"शाही" हा शब्द राजा किंवा राणी ह्यांच्याशी संबंधित लोक आणि वस्तू ह्यांचे वर्णन करतो.

  • "शाही" म्हणवल्या जाणाऱ्या वस्तूंच्या उदाहरणामध्ये, राजाचे कपडे, राजमहल, सिंहासन, आणि मुकुट ह्यांचा समावेश होतो.
  • एखादा राजा किंवा राणी हे सहसा शाही महालात राहतात.
  • एक राजा विशेष कपडे परिधान करत असे, त्याला काहीवेळा "शाही झगे" असे सुद्धा संबोधतात. बऱ्याचदा राजाचा झगा जांभळ्या रंगाचा असे, या रंगाचे उत्पादन अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान प्रकारच्या रंगद्रव्यापासून केले जात होते.
  • नवीन करारात, येशुंच्या विश्वासणाऱ्यांना "राजकीय याजकगण" असे संबोधले गेले. ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "देव जो राजा ह्याची सेवा करणारा याजक" किंवा "देव जो राजा ह्याचा याजक म्हणून बोलावलेला" ह्यांचा समावेश होऊ शकतो.
  • "शाही" या शब्दाचे भाषांतर "राजकीय (राजाला शोभणारा)" किंवा "राजाचा असणारा" असेही केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: राजा, महाल, याजक, जांभळा, राणी, झगा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: