mr_tw/bible/other/bear.md

3.3 KiB

वाहणे (धारण करणे), वाहतो, वाहून नेणे, वाहक

तथ्य:

"वाहणे" या शब्दाचा शब्दशः अर्थ काहीतरी "वाहून" नेणे असा होतो. या शब्दाचे अनेक लाक्षणिक उपयोग देखील आहेत.

  • जेंव्हा एखाद्या स्त्रीबद्दल बोलले जाते, जी एक गर्भ धारण करेल, तेंव्हा त्याचा अर्थ ती एक मुलाला "जन्म देईल" असा होतो.
  • "ओझे वाहणे" ह्याचा अर्थ "कठीण गोष्टींचा अनुभव करणे" असा होतो. या कठीण गोष्टींमध्ये शारीरिक आणि आत्मिक त्रासाचा समावेश होतो.
  • पवित्र शास्त्रामधील सामान्य अभिव्यक्ती "फळ धारण करणे" ज्याचा अर्थ "फळ निर्माण करणे" किंवा "फळ असणे" असा होतो.
  • "साक्ष धारण करणे" या अभिव्यक्तीचा अर्थ "साक्ष देणे" किंवा "जे काही पहिले किंवा अनुभवले त्याचा वृतांत देणे" असा होतो.
  • "त्याच्या वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही" या वाक्याचा अर्थ त्याच्या वडिलांच्या पापाबद्दल "त्याला जबाबदार धरले जाणार नाही" किंवा "त्याला शिक्षा केली जाणार नाही" असा होतो.
  • सामान्यपणे, या शब्दाचे भाषांतर, "वाहणे" किंवा "जबाबदार असणे" किंवा "निर्माण करणे" किंवा "असणे" किंवा "सहन करणे" असे संदर्भाच्या आधारावर केले जाऊ शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा

(हे सुद्धा पहा: ओझे, अलीशा, सहन करणे, फळ, अन्याय, वृतांत, मेंढरू, शक्ती, साक्ष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • विलापगीत 03:25-29

  • Strong's: H2232, H3201, H3205, H5187, H5375, H5445, H5449, H6030, H6509, H6779, G142, G399, G430, G503, G941, G1080, G1627, G2592, G3114, G3140, G4064, G4160, G4722, G4828, G4901, G5041, G5088, G5297, G5342, G5409, G5576