mr_tw/bible/names/syria.md

2.8 KiB

सूरिया

तथ्य:

सुरिया हा देश इस्राएलाच्या उत्तरेला स्थित होता. नवीन कराराच्या काळात, हा रोमी साम्राज्याच्या शासनाखाली असलेला प्रांत होता.

  • जुन्या कराराच्या काळात, सुरियाचे (अरामी) लोक हे लोक इस्राएली लोकांचे सर्वात बलवान सैनिकी शत्रू होते.
  • नामान हा सुरियाच्या (अरामी) सैन्याचा सेनापती होता, ज्याला त्याच्या कुष्टरोगापासून अलीशा संदेष्ट्याने बरे केले.
  • सुरियाचे अनेक रहिवासी हे अरामचे वंशज होते, जो नोहाचा मुलगा शेम ह्याच्या वंशातून खाली आला होता.
  • दिमिश्क, सुरियाची राजधानी, या शहराचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये बऱ्याच वेळा केलेला आहे.
  • शौल दिमिश्क शहराकडे तिथल्या ख्रिस्ती लोकांचा छळ करण्याच्या योजनेने निघाला होता, परंतु येशूने त्याला थांबवले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अराम, सेनापती, दिमिश्क, वंशज, अलीशा, कुष्टरोग, नामान, छळ, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: