mr_tw/bible/other/leprosy.md

4.0 KiB

महारोगी, कोड झालेली, कुष्टरोग, कोड

व्याख्या:

  • पवित्र शास्त्रामध्ये "कुष्टरोगी" या शब्दाचा उपयोग वेगवेगळ्या त्वचेच्या रोगाच्या संदर्भात करण्यात आला आहे. एक "महारोगी' हा असा मनुष्य आहे, ज्याला कुष्टरोग झाला आहे. "कोड" हा शब्द एखाद्या व्यक्तीचे किंवा त्याच्या शरीराच्या भागाचे वर्णन करतो, ज्याला कुष्टरोगाचा संसर्ग झाला आहे.

  • विशिष्ठ प्रकारच्या कुष्टरोगामुळे, त्वचेला पांढऱ्या रंगाचे ठिगळ येतात ज्यामुळे त्वचेचा रंग निघून जातो, जसे मरिया आणि नामान ह्यांना कुष्टरोग झाल्यानंतर झाले.

  • आधुनिक काळात, कुष्टरोग अनेकदा हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांना होऊन, त्याचे नुकसान आणि ते विकृत होतात.

  • देवाने इस्राएली लोकांना दिलेल्या सूचनेनुसार, जेंव्हा एखाद्या मनुष्याला कुष्टरोग होतो, तेंव्हा त्याला "अशुद्ध" समजावे आणि त्याला इतर लोकांच्यापासून दूर राहावे लागत असे, जेणेकरून त्या लोकांना त्या रोगाचा संसर्ग होणार नाही.

  • एका महारोग्याला सहसा "अशुद्ध" म्हणून संबोधले जाई. जेणेकरून इतरांना त्याच्याजवळ न जाण्याचा इशारा देण्यात येई.

  • येशूने अनेक महारोग्यांना बरे केले, आणि इतर लोकांनाही ज्यांना इतर प्रकारचे रोग होते.

भाषांतर सूचना

  • पवित्र शास्त्रामध्ये "कुष्टरोग" या शब्दाचे भाषांतर "त्वचेचा रोग" किंवा "भयंकर त्वचेचा रोग" असे केले जाऊ शकते.
  • "महारोगी" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "कुष्टरोगाने भरलेला" किंवा "त्वचेच्या रोगाचा संसर्ग झालेला" किंवा "संपूर्ण त्वचा फोडांनी झाकलेली" ह्यांचा सामावेश होतो.

(हे सुद्धा पहा: मरिया, नामान, शुद्ध)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: