mr_tw/bible/names/damascus.md

3.2 KiB

दिमिष्क

तथ्य:

दिमिष्क ही अराम देशाची राजधानी आहे. हे आजही त्याच ठिकाणी स्थित आहे, जिथे पवित्र शास्त्राच्या काळात स्थित होते.

  • दिमिष्क हे जगातील सर्वात जुन्या आणि सतत वास्तव्य असलेल्या शहरांपैकी एक आहे.
  • अब्राहमाच्या काळात, दिमिष्क हे अराम राज्याची राजधानी होते (सध्याच्या सिरीया देशात स्थित).
  • संपूर्ण जुन्या करारादरम्यान, दिमिष्कचे रहिवासी आणि इस्राएलाचे रहिवासी ह्यांच्यामधील परस्परसंवादाचे अनेक संदर्भ आहेत.
  • पवित्र शास्त्रातील बऱ्याच भविष्यवाण्यांनी दिमिष्कच्या नाशाचे भाकीत केले आहे. या भविष्यवाण्या कदाचित पूर्ण झाल्या असाव्या, जेंव्हा अश्शुरी लोकांनी जुन्या कराराच्या काळात या शहराचा नाश केला, किंवा कदाचित भविष्यातही, या शहराचा संपूर्ण नाश होण्याची शक्यता आहे.
  • नवीन करारामध्ये, परुशी शौल (नंतर पौल म्हणून ओळखला गेला) हा ख्रिस्ती लोकांना अटक करण्यासाठी दिमिष्काच्या वाटेने निघाला असता, येशूने त्याला समोरून दर्शन दिले आणि येशू तो विश्वासी बनण्यास कारणीभूत झाला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अराम, अश्शुरी, विश्वास, सिरीया (अराम))

पवित्र शास्त्रातील संदर्भ: