mr_tw/bible/names/assyria.md

3.7 KiB

अश्शुर, अश्शुरी, अश्शुरी साम्राज्य

तथ्य:

इस्राएल लोक कनान देशात राहात असताना अश्शूर एक शक्तिशाली राष्ट्र होते. अश्शूरी साम्राज्य हा राष्ट्रांचा एक गट होता जो अश्शूरी राजाच्या अधिपत्याखाली होता.

  • अश्शूर राष्ट्र आताच्या इराकचा उत्तरी भाग असलेल्या प्रदेशात होते.
  • त्यांच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या वेळी अश्शूरी इस्राएल बरोबर लढले.
  • इ.स. पूर्व 722 मध्ये, अश्शूरी लोकांनी पूर्णपणे इस्रायलचे राज्य जिंकले आणि अश्शूरला जाण्यासाठी अनेक इस्राएली लोकांना भाग पाडले.
  • जे इस्राएली लोक मागे राहिले होते त्यांनी अश्शूरी लोकांनी ज्या लोकांना शोमरोनहून आणले होते त्या परदेशीयांबरोबर विवाह केला. इस्त्रायली वंशातील ज्या लोकांनी परराष्ट्रीयांशी विवाह केला त्यांना शोमरोनी म्हणण्यात आले.

(हे सुद्धा पहा: शोमरोन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 20:02 म्हणून देवाने त्या दोन्ही राज्यांना शिक्षा दिली, त्यांच्या शत्रूंना त्यांचा नाश करु दिला. अश्शूर हया दुष्ट व शक्तिशाली राष्ट्राने इस्त्रायलाचा नाश केला. अश्शूरी लोकांनी इस्त्रायलाच्या अनेक लोकांस जीवे मारिले, मौल्यवान वस्तूंची लूटालूट केली व देशाचा बराच भाग जाळून टाकला.

  • 20:03 अश्शूरी लोकांनी सर्व नेत्यांस, श्रीमंतांस व कुशल कारागिरांस एकत्र करुन आपल्या देशामध्ये नेले.

  • 20:04 तेंव्हा __अश्शूराने __ इस्त्रायल राहत असलेल्या ठिकाणी परराष्ट्रीय लोकांस वस्ती करण्यासाठी आणिले.

  • Strong's: H804, H1121