mr_tw/bible/names/samaria.md

5.5 KiB

शोमरोन, शोमरोनी

तथ्य:

शोमरोन हा इस्रायलच्या उत्तरेकडील भागातील शहराचे आणि त्याच्या सभोवतालचे नाव होते. हा प्रांत शारोनाच्या मैदानाच्या पश्चिमेस आणि यार्देन नदीच्या पूर्वेस स्थित होता.

  • जुन्या करारामध्ये, शोमरोन हे उत्तरेकडील इस्राएल राज्याची राजधानी होते. नंतर सभोवतालच्या प्रांताला देखील शोमरोन म्हंटले गेले.
  • जेंव्हा अश्शुरी लोकांनी उत्तरेकडील इस्राएल राज्यावर विजय मिळवला, तेंव्हा त्यांनी शोमरोन शहर काबीज केले आणि उत्तरेकडील इस्राएलांना तो प्रांत सोडून अश्शुराच्या वेगवेगळ्या शहरात जाण्यास भाग पडले.
  • जे इस्राएली लोक निघून गेले होते, त्यांच्या जागी अश्शुरी लोकांनी पुष्कळ परराष्ट्रीयांना शोमरोनच्या प्रांतात आणले.
  • त्या प्रांतात शिल्लक राहिलेल्या काही इस्राएली लोकांनी, तेथे आलेल्या परराष्ट्रीयांबरोबर अंतरवंशीय विवाह केला, आणि त्यांच्या वंशजांना शोमरोनी असे म्हणण्यात आले.

यहुदी लोक शोमरोनी लोकांचा तिरस्कार करत असत, कारण ते अंशतः यहुदी होते, आणि त्यांच्या पूर्वजांनी मूर्तिपूजक देवतांची उपासना केली होती.

  • नवीन कराराच्या कालखंडात, शोमरोन प्रदेशाच्या सीमांच्या उत्तरेला गालीलचा प्रदेश आणि दक्षिणेला यहुदीयाचा प्रदेश होता.

(हे सुद्धा पहा: अश्शुरी, गालील, यहूदिया, शारोन, इस्राएलाचे राज्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 20:04 तेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राहत असलेल्या ठिकाणी परराष्ट्रीय लोकांस वस्ती करण्यासाठी आणिले. परराष्ट्रीयांनी नाश झालेल्या शहरांची पुनर्बांधणी केली व इस्त्रायली स्त्रीयांशी विवाह केला इस्त्रायली वंशातील ज्या लोकांनी परराष्ट्रीयांशी विवाह केला त्यांना शोमरोनी म्हणण्यात आले.

  • 27:08 ‘‘त्या मागून येणारा तिसरा व्यक्ति एक शोमरोनी होता. (शोमरोनी हे यहूदी वंशातील परराष्ट्रीयांशी विवाह केलेले लोक होते. शोमरोनी व यहूदी एकमेकांचा द्वेष करत असत.)

  • 27:09 ‘‘मग त्या शोमरोन्याने त्या मनुष्याला उचलून आपल्या गाढवावर बसविले व त्याने त्याला मार्गावर असलेल्या एका उतार शाळेमध्ये आणिले व त्याची काळजी घेतली.”

  • 45:07 तो शोमरोनामध्ये पळून गेला होता व त्या ठिकाणी त्याने येशूची सुवार्ता सांगितली व अनेकांचे तारण झाले.

  • Strong's: H8111, H8115, H8118, G4540, G4541, G4542