mr_tw/bible/names/kingdomofisrael.md

5.5 KiB

इस्राएलाचे राज्य

तथ्य:

शलमोन राजा मरण पावल्यानंतर, इस्राएलाचे बारा गोत्र दोन राज्यांमध्ये विभागले गेले होते, तेव्हा इस्राएल राष्ट्राचा उत्तरेचा भाग हे इस्राएलाचे राज्य बनले होते.

  • उत्तरेकडील इस्राएलाच्या राज्यामध्ये दहा कुळे होती, आणि दक्षिणेकडील यहुद्यांच्या राज्यामध्ये दोन कुळे होती.
  • इस्राएल राष्ट्राची राजधानी शोमरोन होती. * हे यहुदाची राजधानी यरुशलेम पासून 50 किलोमीटर अंतरावर होते.
  • इस्राएलच्या राज्याचे सर्व राजे दुष्ट होते. त्यांनी लोकांना मूर्तींची आणि खोट्या देवांची उपासना करण्यास प्रभावित केले.
  • देवाने अश्शुराला इस्राएलावर आक्रमण करण्यासाठी पाठवले. बऱ्याच इस्राएली लोकांना अश्शूरमध्ये राहण्यासाठी बंदी करून नेण्यात आले.
  • अश्शूराने उरलेल्या इस्त्राएल राज्याच्या लोकांमध्ये राहण्यासाठी परराष्ट्रीय लोकांस आणिले. या परराष्ट्रीय लोकांनी इस्राएल लोकांशी अंतरवंशीय विवाह केले, आणि त्यांच्या वंशजांना शोमरोनी लोक असे म्हंटले गेले.

(हे सुद्धा पहा: अश्शुरी, इस्राएल, यहूदा, यरुशलेम, शोमरोनाचे राज्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 18:08 इस्राएल राष्ट्राच्या अन्य दहा बंडखोर गोत्रांनी यरुबाम नावाच्या मनुष्यास आपला राजा म्हणून नेमले. त्यांनी उत्तरेच्या भागात आपल्या राज्याची स्थापना केली व त्यांस इस्त्रायलचे राज्य असे संबोधण्यात आले.

  • 18:10 यहूदाचे राज्यइस्त्रायलचे राज्य एकमेकांचे शत्रू झाले व त्यांच्यामध्ये नेहमी लढाया होऊ लागल्या.

  • 18:11 इ‌स्त्रायलाच्या नवीन राज्यामध्ये, सर्वच राजे दुष्ट होते.

  • 20:01 इस्त्रायलाचे राज्य व यहूदाचे राज्य या दोहोंनीही देवाविरुध्द पाप केले.

  • 20:02 अश्शूर हया दुष्ट व शक्तिशाली राष्ट्राने इस्त्रायलाचा नाश केला. अश्शूरी लोकांनी इस्त्रायलाच्या अनेक लोकांस जीवे मारिले, मौल्यवान वस्तूंची लूटालूट केली व देशाचा बराच भाग जाळून टाकला.

  • 20:04 तेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राहत असलेल्या ठिकाणी परराष्ट्रीय लोकांस वस्ती करण्यासाठी आणिले. परराष्ट्रीयांनी नाश झालेल्या शहरांची पुनर्बांधणी केली व इस्त्रायली स्त्रीयांशी विवाह केला इस्त्रायली वंशातील ज्या लोकांनी परराष्ट्रीयांशी विवाह केला त्यांना शोमरोनी म्हणण्यात आले.

  • Strong's: H3478, H4410, H4467, H4468