mr_tw/bible/other/persecute.md

5.1 KiB
Raw Permalink Blame History

पाठलाग, छळ, छळ करणे, छळणूक, छळ करणारा, छळणारे

व्याख्या:

"पाठलाग करणे" आणि "छळ" हे शब्द एखाद्या व्यक्तीस किंवा लोकांच्या विशिष्ट गटाशी सतत कठोरपणे वागण्याचा संदर्भ देतात, ज्यामुळे त्यांना हानी पोहोचते.

  • छळणूक सहसा एका व्यक्तीविरोधात किंवा अनेक लोकांविरोधात असू शकते आणि त्यामध्ये सहसा सक्तीच्या हल्ल्यांच्या पुनरावृत्तीचा समावेश होतो.
  • इस्राएल लोकांचा अनेक लोकसमूहाकडून छळ केला गेला, ज्यांनी त्यांच्यावर हल्ले केले, त्यांना बंदिवान बनवले, आणि त्यांच्या वस्तू चोरून नेल्या.
  • लोक बऱ्याच वेळा इतर धार्मिक श्रद्धा असलेल्या किंवा जे दुर्बल आहेत अशा इतर लोकांचा छळ करतात.
  • यहुदी धर्मपुढाऱ्यांनी येशूचा छळ केला, कारण तो जे शिकवत होता ते त्यांना आवडत नव्हते.
  • येशू स्वर्गात गेल्यानंतर, यहुदी धर्मपुढाऱ्यांनी आणि रोमी सरकारने त्याच्या अनुयायांचा छळ केला.
  • "छळ करणे" या शब्दाचे भाषांतर "जुलूम करणे" किंवा "कठोरपणे वागवणे" किंवा "सतत वाईट वागणूक देणे" असे केले जाऊ शकते.
  • "छळणूक" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "कठोर दुर्व्यवहार" किंवा "दडपशाही" किंवा "सतत दुखावणारी वागणूक" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: ख्रिस्ती, मंडळी, दडपणे, रोम)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 33:07 ‘‘खडकाळ जमीन म्हणजे अशी व्यक्ती जो देवाचे वचन ऐकूतो आणि नंदाने स्वीकारतो. परंतू कष्ट व छळ आल्यानंतर लगेच अडखळतात.

  • 45:06 त्या दिवसांमध्ये, यरूशलेमेतील पुष्कळ लोक येशूच्या शिष्यांचा छळ करत होते, म्हणून शिष्य दुस-या ठिकाणी पळून गेले.

  • 46:02 शौलाने कोणी तरी हाक मारतांना ऐकले, "शौला! शौला! तू माझा छळ का करतोस?" शौलाने विचारले, "प्रभु, तू कोण आहेस?" येशूने त्यास म्हटले, "मी येशू आहे. ज्याचा तू छळ करत आहेस!"

  • 46:04 परंतु हनन्या म्हणाला, "प्रभूजी, मी ऐकले आहे की हा मनुष्य कशाप्रकारे ख्रिस्ती लोकांचा छळ केला आहे."

  • Strong's: H1814, H4783, H7291, H7852, G1375, G1376, G1377, G1559, G2347