3.4 KiB
3.4 KiB
इथ्रो, रगुवेल
तथ्य:
"इथ्रो" आणि "रगुवेल" ही दोन्ही नावे मोशेची पत्नी सिप्पोरा, हिच्या पित्याला संदर्भित करतात. जुन्या करारामध्ये "रगुवेल" नावाचे आणखी दोन मनुष्य होते.
- जेंव्हा मोशे मिद्यानाच्या भूमीत मेंढपाळ होता, तेंव्हा त्याने मिद्यानी मनुष्य रगुवेल ह्याच्या मुलीशी विवाह केला.
- नंतर रगुवेलाला "इथ्रो, मिद्यानाचा याजक" म्हणून संदर्भित केले. कदाचित "रगुवेल" हे त्याच्या कुळाचे नाव असू शकते.
- जेंव्हा देव मोशेशी जळत्या झाडीद्वारे बोलला, तेंव्हा मोशे इथ्रोची मेंढरे चरित होता.
- देवाने इस्राएली लोकांना मिसरातून सोडविल्याच्या काही काळानंतर, इथ्रो वाळवंटात इस्राएली लोकांच्या जवळ आला आणि त्याने मोशेला लोकांच्या प्रकरणांचा न्याय करण्याविषयी चांगला सल्ला दिला.
- जेंव्हा त्याने इस्राएली लोकांसाठी मिसरमध्ये देवाने केलेल्या चमत्कारांबद्दल ऐकले, तेंव्हा त्याने देवावर विश्वास ठेवला.
- एसावाच्या मुलांपैकी एकचे नाव रगुवेल होते.
- अजून एक मनुष्य ज्याचे नाव रगुवेल होते, त्याचा उल्लेख इस्राएलाच्या वंशावळीत केला आहे, जो बाबेलाचा बंदिवास संपल्यानंतर पुनर्स्थापित होण्यासाठी यहुदाला परतला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: बंदी, कुळ, वाळवंट, मिसर, एसाव, चमत्कार, मोशे, वाळवंट)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H3503, H7467