mr_tw/bible/other/clan.md

2.2 KiB

कुळ, कुळे

व्याख्या:

"कुळ" या शब्दाचा संदर्भ, कुटुंबातील लोकांचा विस्तारलेल्या समूहाशी आहे, जो एकाच पूर्वजांपासून आलेला आहे.

  • जुन्या करारामध्ये, इस्राएल लोकांची गणती त्यांच्या कुळांप्रमाने किंवा कुटुंब समूहाप्रमाणे होत असे.
  • कुळांचे नाव, सामान्यतः त्यांच्या प्रसिद्ध पूर्वजांच्या नावावरून ठेवले जात असे.

कधीकधी वैयक्तिक मनुष्यांना त्यांच्या कुळाच्या नावाने संदर्भित केले जात असे. याचे एक उदाहरण म्हणजे जेव्हा मोशेचे सासरे जथ्रो यांना कधी कधी त्यांच्या कुळांचे नावाने, रगुवेल बोलवले जाते.

  • ह्याचे भाषांतर "कुटुंब समूह" किंवा "विस्तारित कुटुंब" किंवा "नातेवाईक" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: कुटुंब, जथ्रो, वंश)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: