mr_tw/bible/other/captive.md

4.6 KiB

बंदीवान, कैद्यांना (कैदी), ताबा मिळवणे, ताबा मिळवला, पाडावपणात (कैदेत, बंदिवासात)

व्याख्या:

"बंदिवान" आणि "बंदिवासात" हे शब्द लोकांना पकडणे आणि त्यांना अशा ठिकाणी राहण्यास भाग पाडणे, जिथे त्यांची राहण्याची इच्छा नाही, जसे की, परराष्ट्रात, ह्याला सूचित करतात.

  • यहूदाच्या राज्यातील इस्राएल लोक बाबेलाच्या राज्यामध्ये 70 वर्षे बंदिवान म्हणून होते.
  • बंदीवानांनी ज्या लोकांनी किंवा राष्ट्रांनी त्यांना पकडून नेले आहे त्यांच्यासाठी काम करणे गरजेचे होते.
  • दानीएल आणि नहेम्या हे इस्राएली बंदिवान बाबेलाच्या राजासाठी काम करत होते.
  • "बंदिवान करणे" असा शब्दप्रयोग एखाद्याला पकडण्याविषयी बोलण्याचा एक दुसरा मार्ग आहे.
  • "कैद करून नेणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "बंदिवान म्हणून राहण्यास भाग पाडणे" किंवा "कैदी म्हणून दुसऱ्या देशात घेऊन जाणे" असे केले जाऊ शकते.
  • लाक्षणिक अर्थाने, प्रेषित पौल ख्रिस्ती लोकांना प्रत्येक विचारास "बंदीस्त" करण्यास आणि ख्रिस्ताशी आज्ञाधारक राहण्यास सांगतो.
  • तो पाप कसे एखाद्या व्यक्तीला "कैद करून नेऊ" शकते ह्याबद्दल देखील बोलतो, ज्याचा अर्थ पापाद्वारे "नियंत्रित केले जाणे" असा होतो.

भाषांतर सूचना

  • संदर्भावर आधारित, "बंदिवासात असणे" ह्याचे भाषांतर "मुक्त होण्यास परवानगी नसणे" किंवा "तुरुंगात ठेवणे" किंवा "परदेशात राहण्यास भाग पडणे" असे केले जाऊ शकते.
  • "बंदी करून नेणे" किंवा "बंदी करून घेऊन जाणे" या अभिव्याक्तींचे भाषांतर "पकडले" किंवा "कैदेत ठेवणे" किंवा "परदेशात जाण्यास भाग पडणे" असे केले जाऊ शकते.
  • "कैदी" या शब्दाचे भाषांतर "पकडले गेलेले लोक" किंवा "गुलाम बनवलेले लोक" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भावर आधारित, "पाडाव करून नेणे (कैदेत ठेवणे)" हा शब्द "कारावास" किंवा "हद्दपार" किंवा "परदेशात राहण्यास भाग पडलेला" म्हणून सुद्धा भाषांतरित केला जाऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: बाबेल, हद्दपार, कैद, पकडणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: