mr_tw/bible/other/seize.md

3.7 KiB

धरणे (ताब्यात घेणे), धरले, धरावयास पाहणे

व्याख्या:

"धरणे" या शब्दाचा अर्थ एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला जबरदस्तीने पकडणे असा होतो. ह्याचा अर्थ ताबा घेणे आणि नियंत्रित करणे असाही होऊ शकतो.

  • जेंव्हा एखाद्या शहराला सैन्याच्या दलाद्वारे हस्तगत केले जाते, तेंव्हा काबीज केलेल्या लोकांच्या मालमत्तेला सैनिकांद्वारे ताब्यात घेतली जाते.
  • जेंव्हा लाक्षणिक अर्थाने उपयोग केला जातो, तेंव्हा एखाद्या व्यक्तीचे वर्णन "त्याला भीतीने धरले आहे" असे केले जाऊ शकते. ह्याचा अर्थ त्या व्यक्तीचा अचानक "भीतीने ताबा घेतला" असा होतो. जर एखाद्या व्यक्तीला "भीतीने धरले जाते," तेंव्हा असे म्हंटले जाते की, तो व्यक्ती "अचानक खूप भयभीत झाला."
  • प्रसूती वेदनेच्या संदर्भात, जेंव्हा वेदना स्त्रीला "धरतात" तेंव्हा, त्याचा अर्थ त्या वेदना अचानक आणि त्या स्त्रीवर ताबा घेणाऱ्या असतात, असा होतो. ह्याचे भाषांतर, त्या वेदना त्या स्त्रीवर "नियंत्रण" मिळवतात किंवा "तिच्यावर अचानक येतात" असे म्हणून केले जाऊ शकते.
  • ह्याचे भाषांतर "नियंत्रण मिळवणे" किंवा "अचानक घेणे" किंवा "बळकावणे"असे देखील केले जाऊ शकते.
  • "धरले आणि तिच्याबरोबर झोपला" ह्याचे भाषांतर "स्वतःला तिच्यावर सक्ती केली" किंवा "तिचे उल्लंघन केले" किंवा "तिचा बलात्कार केला" असे केले जाऊ शकते. * या शब्दाचे भाषांतर स्वीकृत होईल, ह्याची काळजी घ्या.

(पहा: युफेमिसम (अप्रिय गोष्ट सौम्य भाषेत सांगणे, शोभनभाषित)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: