mr_tw/bible/other/exile.md

3.6 KiB

बंदिवान, तडीपार केलेले (हद्दपार केलेले), पाडाव करून नेले

व्याख्या:

"बंदिवान" या शब्दाचा संदर्भ लोकांना सक्तीने त्याच्या मूळ देशापासून कुठेतरी दूर जाऊन जगण्यास भाग पाडणे ह्याच्या संबंधात येतो.

  • लोकांना सहसा शिक्षा म्हणून किंवा राजकीय कारणांस्तव बंदिवासात पाठवले जाते.
  • जिंकलेल्या लोकांना कदाचित बंदिवान म्हणून जिंकणारे सैनिक त्यांच्या देशात त्यांच्यासाठी काम करण्यास घेऊन जातात.
  • "बाबेली बंदिवान" (किंवा "बंदिवासात") हा पवित्र शास्त्राच्या इतिहासातील असा काळ होता, जेंव्हा यहुदामधील अनेक यहुदी नागरिकांना त्यांच्या घरापासून घेऊन गेले आणि त्यांना बाबेलामध्ये सक्तीने राहायला लावले. असे 70 वर्षापर्यंत चालले.
  • "बंदिवान" या वाक्यांशाचा संदर्भ, लोकांशी आहे, जे त्यांच्या मूळ देशापासून दूर, कैदी म्हणून राहत होते.

भाषांतर सूचना

  • "बंदिवान" या शब्दाचे भाषांतर, "दूर पाठवणे" किंवा "जबरदस्तीने बाहेर काढणे" किंवा "हद्दपार करणे" असे केले जाऊ शकते.
  • "बंदिवासात" या शब्दाचे भाषांतर "दूर पाठवण्याचा काळ" किंवा "हद्दपारीचा काळ" किंवा "सक्तीने अनुपस्थितीचा काळ" किंवा "हद्दपारी" अशा अर्थाच्या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाऊ शकते.
  • "बंदिवासात" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "बंदी केलेले लोक" किंवा "हद्दपार केलेले लोक" किंवा "बाबेलात बंदी केलेले लोक" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: बाबेल, यहूदा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: