mr_tw/bible/names/hittite.md

2.9 KiB

हित्ती

व्याख्या:

हित्ती हे हामचे वंशज त्याचा पुत्र कनान ह्याच्याद्वारे होते. ते एक मोठे साम्राज्य बनले, जे आताचा तुर्की देश आणि उत्तरी पलीष्ट्याच्या देशाचा भाग आहे तिथे स्थित होते.

  • अब्राहामाने एफ्रोन हित्ती ह्याच्यापासून जमिनीचा एक तुकडा विकत घेतला, जेणेकरून तो त्याच्या मृत बायकोला, साराला तिथल्या गुहेत दफन करू शकेल. कालांतराने अब्राहाम आणि त्याच्या वंशाजांपैकी अनेकांना त्या गुहेमध्ये दफन करण्यात आले.
  • एसावाचे पालक दुःखी झाले, जेंव्हा त्याने दोन हित्ती स्त्रियांना बायको करून घेतले.
  • दाविदाच्या शूर पुरुषांपैकी एका मनुष्याचे नाव उरिया हित्ती होते.
  • शलमोनाने लग्न केलेल्या काही विदेशी स्त्रिया हित्ती होत्या. त्या विदेशी स्त्रियांनी शलमोनाचे मान देवापासून दूर वळवले, त्याचे कारण त्या खोट्या देवाची उपासना करत होत्या.
  • हित्ती लोकांनी बऱ्याचदा इस्राएली लोकांना, शारीरिकदृष्ट्या आणि आत्मिकदृष्ट्या धोका दिला.

(हे सुद्धा पहा: वंशज, एसाव, विदेशी, हाम, शूर, शलमोन, उरिया)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: