3.0 KiB
3.0 KiB
उरीया
तथ्य:
उरीया हा एक नीतिमान मनुष्य, आणि दावीद राजाचा एक उत्तम सैनिक होता. त्याला सहसा "उरीया हित्ती" असे संबोधित केले जाते.
- उरीया ह्याला एक अतिशय सुंदर पत्नी होती तिचे नाव बेथशेबा होते.
- दावीदाने उरीयाच्या पत्नीबरोबर व्यभिचार केला, आणि ती दाविदापासून गर्भवती राहिली.
- हे पाप झाकण्यासाठी, दावीदाने उरीयाला युद्धात मरावयास लावले. नंतर दावीदाने बेथशेबा हिच्याची विवाह केला.
- अजून एक उरीया नावाचा मनुष्य, अहाज राजाच्या काळात याजक होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अहाज, बेथशेबा, दावीद, हित्ती)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
बथशेबाचा पती उरीया हा दाविदाचा शूर योद्धा होता. दाविदाने उरीयास युद्धातून परत बोलावले व आपल्या पत्नी बरोबर राहण्यास सांगितले. परंतु दूसरे सैनिक युद्ध करत असताना आपण घरी जाणे योग्य नव्हे असे समजून त्याने घरी जाण्यास नकार दिला. म्हणून दाविदाने उरीयास परत युद्धामध्ये पाठविले व सेनापतीस सांगितले की त्याने तुंबळ युद्धाच्या ठिकाणी उरीयाची नेमणूक करावी म्हणजे उरीया युद्धात मारला जाईल.
-
उरीया मेल्यानंतर दाविदाने बथशेबाशी लग्न केले.
-
Strong's: H223, G3774