3.5 KiB
3.5 KiB
बथशेबा
तथ्य:
बथशेबा ही दाविद राजाच्या सैन्यातील एक सैनिक उरीया याची पत्नी होती. उरीया मरण पावल्यानंतर बथशेबा दाविदाची पत्नी आणि शलमोनाची आई बनली.
- दावीदाने बथशेबेशी तिचे उरीयाशी लग्न झाले असतानाही व्यभिचार केला.
- जेव्हा बथशेबा दाविदापासून त्याच्या बाळाची गर्भवती झाली तेव्हा दाविदाने उरीयाला लढाईत मारले जाऊ दिले.
- नंतर दाविदाने बथशेबाशी लग्न केले आणि तिने त्यांच्या मुलास जन्म दिला.
- दाविदाला त्याच्या पापाबद्दलची शिक्षा म्हणून परमेश्वराने त्या मुलाचा जन्म झाल्यापासून अनेक दिवसांनंतर त्याचा मृत्यू घडवून आणला.
- नंतर, बथशेबाने आणखी एका मुलाला शलमोनाला जन्म दिला जो मोठा होऊन दाविदा नंतर राजा झाला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: दावीद, शलमोन, उरिया)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
17:10 एके दिवशी दाविदाचे सर्व सैन्य युद्धासाठी बाहेर गेले असताना, त्याने आपल्या राजमहालातून एक सुंदर स्त्री स्नान करीत असताना पाहिली. तिचे नाव बथशेबा होते.
-
17:11 काही काळानंतर आपण गरोदर असल्याचा निरोप तिने दाविदास पाठविला.
-
17:12 बथशेबाचा पती उरीया हा दाविदाचा शूर योद्धा होता.
-
17:13 उरीया मेल्यानंतर दाविदाने बथशेबाशी लग्न केले.
-
17:14 नंतर दाविद व बथशेबा यांना आणखी एक पुत्र झाला, आणि त्यांनी त्याचे नाव शलमोन असे ठेवले.
-
Strong's: H1339