mr_tw/bible/names/solomon.md

5.4 KiB

शलमोन

तथ्य:

शलमोन हा दाविदाच्या मुलांपैकी एक होता. त्याच्या आईचे नाव बेथशेबा होते.

  • जेंव्हा शलमोन राजा बनला, देवाने त्यांना सांगितले की तुला पाहिजे ते तू माग. म्हणून शलमोनाने लोकांच्यावर न्यायीपणाने आणि चांगले शासन करण्याकरिता सुज्ञान मागितले. शलमोनाच्या विनंतीने देव आनंदित झाला आणि त्याने त्याला दोन्ही सुज्ञान आणि भरपूर संपत्ती दिली.
  • शलमोन हा यरुशलेममध्ये असलेले भव्य मंदिर बांधण्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे.
  • जरी शलमोनाने त्याच्या राज्य करण्याच्या सुरवातीच्या काळात सुज्ञपणे शासन केले, तरी नंतर त्याने मूर्खपणाने परराष्ट्रीय स्त्रियांशी लग्न केले आणि त्यांच्या देवांची उपासना करण्यास सुरवात केली.
  • शलमोनाच्या अविश्वासूपणामुळे, त्याच्या मृत्यनंतर देवाने इस्रायेलाचे, इस्राएल आणि यहूदा असे दोन भाग केले. हे राज्ये सहसा एकमेकांच्या विरोधात लढली.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बेथशेबा, दावीद, इस्राएल, यहूदा, इस्राएलाचे राज्य, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 17:14 नंतर दाविद व बथशेबा यांना आणखी एक पुत्र झाला, आणि त्यांनी त्याचे नाव शलमोन असे ठेवले.

  • 18:01 ब-याच वर्षानंतर, दाविद मरण पावला आणि त्याचा पुत्र शलमोन हा इस्त्राएलवर राज्य करु लागला. देवाने शल्मोनास दर्शन दिले व त्यास सर्वात अधिक काय हवे आहे असे विचारले. जेंव्हा शल्मोनाने बुद्धि मागितली तेंव्हा देव त्याच्यावर प्रसन्न झाला व त्याने त्याला जगातील सर्वांत ज्ञानी मनुष्य बनविले. शल्मोन अनेक गोष्टी शिकला व तो एक सुज्ञ न्यायाधीश झाला. परमेश्वराने त्यास खूप श्रीमंत बनविले.

  • 18:02 आपला बाप दाविद याच्या योजनेप्रमाणे व त्याने जमविलेल्या साधन सामग्रीने शल्मोनाने यरुशलेममध्ये एक मंदिर बांधले.

  • 18:03 परंतू शल्मोनाने परराष्ट्रीय स्त्रीयांवर प्रेम केले. शलमोन वृद्ध झाल्यानंतर त्यानेही त्यांच्या दैवतांची पूजा केली.

  • 18:04 देव शल्मोनाने केलेल्या कृत्यांविषयी त्याजवर कोपला. त्याच्या हया अविश्वासूपणाबद्दल देवाने त्यास शासन केले. देवाने शल्मोनाच्या मृत्यूनंतर इस्त्रायलाच्या राज्याचे दोन भाग केले.

  • Strong's: H8010, G4672