mr_tw/bible/names/abiathar.md

1.7 KiB

अब्याथार

व्याख्या:

दावीद राजाच्या काळात अब्याथार हा इस्राएलचा महायाजक होता.

  • शौल राजाने जेव्हा याजकांना ठार मारले तेव्हा अब्याथार पळून वाळवंटात दाविदाकडे गेला.
  • अब्याथार आणि सादोक नावाच्या आणखी एका महायाजकाने दावीदाच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये विश्वासाने त्याची सेवा केली.
  • दाविदाच्या मृत्यूनंतर, अब्याथारने शलमोनाऐवजी अदोनियाला राजा बनण्याच्या प्रयत्नात मदत केली.
  • या कारणास्तव, शलमोन राजाने अब्याथारला याजक पदावरून काढून टाकले.

(हे सुद्धा पहा सादोक, शौल, दावीद, शलमोन, अदोनीया)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: