mr_tw/bible/kt/testimony.md

12 KiB
Raw Blame History

साक्ष, साक्षी, साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी, प्रत्यक्ष पाहणारे

व्याख्या:

जेव्हा एखादी व्यक्ती "साक्ष" देतो तेव्हा तो ज्या गोष्टीबद्दल त्याला माहिती देतो त्याबद्दल तो विधान करतो आणि असा दावा करतो की ते विधान सत्य आहे. "साक्ष सांगणे" म्हणजेच "साक्ष देणे" आहे.

बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष अनुभवलेल्या गोष्टींबद्दल "पुष्टी केली" आहे.

  • जो साक्षीदार "खोटी साक्ष" देतो तो खर काय घडल आहे ते सांगत नाही.
  • कधीकधी शब्द "साक्ष" हा संदेष्ट्याने केलेल्या भविष्यवाणीचा संदर्भ देतो.
  • नवीन करारामध्ये, या शब्दाचा उपयोग अनेकदा येशूचे अनुयायी येशूचे जीवन, मृत्यू आणि पुनरुत्थान यांच्या घटनांबद्दल साक्ष देण्याच्या संदर्भात वापरतात.

"साक्षी" या शब्दाचा संदर्भ एखाद्या व्यक्तीने जे घडल आहे त्याचा वैयक्तिकरित्या अनुभव घेतला आहे याच्याशी आहे. सामान्यत: साक्षी देखील अशी एक व्यक्ती आहे जो जे त्याला माहिती आहे ते सत्य आहे त्याबद्दल साक्ष देतो. "प्रत्यक्षदर्शी" हा शब्द जे काही घडल आहे तेथे तो व्यक्ती प्रत्यक्षात होता आणि त्याने काय झाले ते पाहिले आहे ह्यावर भर देतो.

  • एखाद्या गोष्टीबद्दल "साक्ष" देणे म्हणजे जे काही घडले ते घडताना पाहणे.
  • चौकशी दरम्यान, एक साक्षी "साक्ष देतो" किंवा "साक्ष धारण करतो." याचे अर्थ "साक्ष सांगणे" म्हणूनच आहे.
  • साक्षीदारांनी जे पाहिले व ऐकले आहे त्याविषयी सत्य सांगण्याची अपेक्षा केली जाते.
  • जो साक्षीदार काय घडले त्याबद्दल सत्य सांगत नाही त्याला "खोटे साक्षी" असे म्हटले जाते. त्याला "खोटी साक्ष देणे" किंवा "खोटी साक्ष धारण करणे" असे म्हणतात.
  • "दोहोंमधील साक्षीदार" या अभिव्यक्तीचा अर्थ ज्यांनी करार केला आहे त्यांच्यामध्ये काहीतरी किंवा कोणीतरी पुरावा म्हणून असणे. प्रत्येक व्यक्तीने जे वचन दिले आहे तो ते पूर्ण करेल हे सुनिश्चित करण्याचे काम साक्षीदार करतो.

भाषांतर सूचना

  • "साक्ष सांगणे" किंवा "साक्ष देणे" या शब्दाचे भाषांतर "तथ्ये सांगणे" किंवा "काय पाहिले किंवा ऐकले गेले ते सांगणे" किंवा "वैयक्तिक अनुभवातून सांगणे" किंवा "पुरावा देणे" किंवा "काय झाले ते सांगणे" असेही केले जाऊ शकते.
  • "साक्ष" या शब्दाला भाषांतरीत करण्याच्या पद्धतींमध्ये, "काय घडले आहे त्याचा अहवाल देणे" किंवा "जे सत्य आहे त्याचे कथन करणे" किंवा "पुरावे देणे" किंवा "काय सांगितले गेले आहे" किंवा "भविष्यवाणी" यांचा समावेश असू शकतो.
  • "त्यांना साक्ष म्हणून" या वाक्यांशाचे भाषांतर, "सत्य काय आहे हे त्यांना दाखवणे" किंवा "सत्य काय आहे हे त्यांना सिद्ध करणे" असे केले जाऊ शकते.
  • "त्यांच्याविरूद्ध साक्ष म्हणून" या वाक्यांशाचे भाषांतर, "जे त्यांना त्यांचे पाप दर्शवेल" किंवा "त्यांच्या ढोंगीपणा उघडकीस आणेल" किंवा "जे त्यांना ते चुकीचे आहेत ते सिद्ध करेल" असेही केले जाऊ शकते.
  • "खोटी साक्ष देणे" या शब्दाचे भाषांतर "च्या बद्दल खोट्या गोष्टी सांगणे" किंवा "सत्य नसलेल्या गोष्टी सांगणे" असे केले जाऊ शकते.
  • "साक्षी" किंवा "प्रत्यक्षदर्शी" या शब्दांचे भाषांतर "व्यक्ती पाहत आहे" किंवा "एखादा व्यक्ती ज्याने हे घडलेले पाहिले" किंवा "ज्यांनी पाहिले आणि ऐकले (त्या गोष्टी)" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशानी केले जाऊ शकते.
  • काहीतरी जे "एक साक्षी" आहे त्याचे भाषांतर "हमी" किंवा "आपल्या वचनाचे चिन्ह" किंवा "असे काहीतरी जे सिद्ध करते की हे सत्य आहे" असेही केले जाऊ शकते.
  • "तुम्ही माझे साक्षीदार व्हाल" या वाक्यांशाचे भाषांतर "तूम्ही माझ्याबद्दल इतर लोकांना सांगाल" किंवा "तुम्ही लोकांना जे सत्य मी तुम्हांस शिकवले ते शिकवाल" किंवा "मी जे करताना तुम्ही पहिले आणि शिकवताना तुम्ही ऐकले ते तुम्ही लोकांना सांगाल" असेही केले जाऊ शकते.
  • च्यापर्यंत "साक्षी" या शब्दाचे भाषांतर "आपण जे पहिले होते ते सांगणे" किंवा "साक्ष सांगणे" किंवा "काय घडले ते कथन करणे" असे केले जाऊ शकते.
  • एखाद्याविषयी "साक्ष" देणे या शब्दाचे भाषांतर "काहीतरी पाहणे" किंवा "काहीतरी घडत असल्याचा अनुभव घेणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: कराराचा कोश, दोषी, न्यायाधीश, संदेष्टा, साक्ष सत्य)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 39:02 आत घरामध्ये, यहूदी धर्मपुढारी येशूची चौकशी करीत होते. त्यांनी येशूविरुद्ध अनेक खोटे साक्षीदार आणले होते.
  • 39:04 तेंव्हा महायाजकाने रागाने आपली वस्त्रे फाडिली व अन्य धार्मीक पुढा-यांसमोर मोठयाने म्हणाला, ‘‘आता आम्हास आणखी पुराव्याची गरज नाही! तो देवाचा पुत्र आहे असे त्याने म्हटले हे तुम्ही स्वत: ऐकले आहे. तुमचा निवाडा काय आहे?
  • 42:08 "धर्मशास्त्रामध्ये हेही लिहिले होते की माझे शिष्य पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाची घोषणा करतील. ते यरूशलेमेपासून या संदेशास आरंभ करतील, मग सर्व ठिकाणच्या सर्व लोकांकडे हा संदेश घेऊन जातील. तुम्ही या गोष्टींचे साक्षीदार आहात."
  • 43:07 आम्ही या गोष्टीविषय़ीचे साक्षीदार आहेत की देवाने येशूला मरणातून पुन्हा उठविले आहे."

Strong's

  • Strong's: H5707, H5713, H5715, H5749, H6030, H8584, G267, G1263, G1957, G2649, G3140, G3141, G3142, G3143, G3144, G4303, G4828, G4901, G5575, G5576, G5577, G6020