4.2 KiB
4.2 KiB
दोष, दोषी
व्याख्या:
"दोष" या शब्दाचा संदर्भ पाप केलेले असण्याचे किंवा गुन्हा केलेल्याच्या तथ्याशी आहे.
- "दोषी असणे" म्हणजे नैतिकदृष्ट्या काहीतरी चुकीचे केलेले असणे, म्हणजेच, देवाच्या आज्ञेचे पालन केलेले नसणे.
- "दोषी" च्या विरुद्धार्थी शब्द "निरपराध" हा आहे.
भाषांतर सूचना
- काही भाषा "दोष" या शब्दाचे भाषांतर कदाचित "पापाचे वजन" किंवा "पापांची मोजणी" असे करतात.
- "दोषी असणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "चुकीचे असणे" किंवा "नैतिकदृष्ट्या काहीतरी चुकीचे केलेले असणे" किंवा "पाप केलेले असणे" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: निरपराध, अन्याय, शिक्षा, पाप)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- 39:02 त्यांनी येशूविरुद्ध अनेक खोटे साक्षीदार आणले होते. तथापि, त्यांच्या जबानीमध्ये मेळ नव्हता म्हणुन यहूदी पुढा-यांना येशूचा गुन्हा सिद्ध करता आला नाही.
- 39:11 येशूबरोबर बोलल्यानंतर पिलात बाहेर असलेल्या जमावास म्हणाला, ‘‘मला या मनुष्यामध्ये काहीच दोष आढळत नाही.’’ परन्तु यहूदी पुढारी व लोकसमुदाय मोठयाने ओरडले, ‘‘त्याला वधस्तंभावर खिळून टाका!’’ यावर पिलात उत्तरला, ‘‘तो निर्दोष आहे!’’ पण ते आणखी मोठयाने ओरडू लागले. तेंव्हा पिलात तिस-यांदा म्हणाला, ‘‘तो निरपराध आहे.’’
- 40:04 येशूला दोन लुटारुंच्या मधोमध वधस्तंभावर खिळण्यात आले. त्यापैकी एकाने येशूची थट्टा केली, परंतू दुसरा म्हणाला,‘‘तू देवाला भित नाही काय? आपण दोषी आहोत, पण हा मनुष्य निर्दोष आहे.’’
- 49:10 तुमच्या पापांमुळे तुम्ही दोषी आहात व मरणदंडास पात्र आहात.
Strong's
- Strong's: H816, H817, H818, H5352, H5355, G338, G1777, G3784, G5267