mr_tw/bible/kt/sin.md

11 KiB
Raw Blame History

पाप, पापे, पापमय, पापी,

व्याख्या:

"पाप" या शब्दाचा संदर्भ देवाच्या इच्छेच्या आणि नियमांच्या विरुद्ध असलेल्या क्रिया, विचार आणि शब्द यांच्याशी आहे. पापाचा संदर्भ आपल्याबद्दल देवाची जी इच्छा आहे ती ना करण्याशी देखील होऊ शकतो.

  • अशा काही गोष्टी आहेत ज्या देवाच्या आज्ञेत नाहीत किंवा देवाला संतुष्ट करीत नाहीत, अगदी त्या गोष्टी इतर लोकांना सुद्धा माहित नाहीत अशा गोष्टींचा पापामध्ये समावेश होतो.
  • देवाच्या इच्छेच्या आज्ञा न पाळणाऱ्या विचार व कृतींना "पापमय" असे म्हटले जाते.
  • आदामाने पाप केल्यामुळे, सर्व मानवजात एक "पापमय स्वभावाबरोबर" जन्माला येते, हा स्वभाव जो त्यास नियंत्रित करतो आणि त्यांना पाप करण्यास प्रवृत्त करतो.
  • एक "पापी" म्हणजे जो पाप करतो, म्हणून सर्व मानव प्राणी पापी आहेत.
  • काहीवेळा "पापी" हा शब्द परुश्यांसारख्या धार्मिक लोकांनी अशा लोकांच्या संदर्भासाठी वापरला होता, जे लोक नियमशास्त्र पळत न्हवते, त्याच बरोबर परुशी विचार करीत की त्यांनी पाळायला हवा.
  • "पापी" या शब्दाचा उपयोग अशा लोकांसाठी वापरला जातो जे लोक इतर लोकांपेक्षा वाईट पापी मानले जातात. उदाहरणार्थ, हे लेबल जकातदार आणि वेश्या यांना देण्यात आले होते

भाषांतर सूचना

  • "पाप" या शब्दाचे भाषांतर "देवाचा आज्ञाभंग करणे" किंवा "देवाच्या इच्छेविरुद्ध चालणे" किंवा "वाईट वागणूक आणि विचार" किंवा "अपराध करणे" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
  • "पाप" या शब्दाचे भाषांतर "देवाची आज्ञा मोडणे" किंवा "चुकीचे करणे" असेही केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर "पापमय" या शब्दाचे भाषांतर "पापाने भरलेले असणे" किंवा "दुष्ट" किंवा "अनैतिक" किंवा "वाईट" किंवा "देव विरुद्ध बंड करणारे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर "पापी" या शब्दाचे भाषांतर "पाप करणारी व्यक्ती" किंवा "वाईट गोष्टी करणारी व्यक्ती" किंवा "देवाची आज्ञा न मानणारी व्यक्ती" किंवा "नियमशास्त्राचे पालन न करणारी व्यक्ती" अशा शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
  • "पापी" या शब्दाचे भाषांतर "अत्यंत पापमय लोक" किंवा "असे लोक जे अत्यंत पापमय समजले जातात" किंवा "अनैतिक लोक" अशा शब्दाने किंवा वाक्यांशाद्वारे केले जाऊ शकते.
  • "जकातदार आणि पापी" या शब्दांचे भाषांतर करण्याच्या पद्धतीमध्ये "जे लोक सरकारसाठी पैसे गोळा करतात आणि इतर अत्यंत पापमय लोक" किंवा "खूप पापमय लोक, ज्यात जकातदार (सुद्धा) आहेत" अशा वाक्यांशाचा समावेश होतो.
  • "पापाचे गुलाम" किंवा "पापाच्या अधिपत्याखाली" या शब्दांच्या अभिव्यक्तीमध्ये "पाप" हा शब्द "आज्ञाभंग" किंवा "वाईट इच्छा आणि कृती" असा भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • या शब्दाच्या भाषांतरामध्ये पापमय वागणूक आणि विचार, अगदी इतर लोक पाहू शकत नाहीत किंवा त्याबद्दल माहित देखील नाही हे वाक्यांश समाविष्ट होतील याची खात्री करून घ्या.
  • "पाप" हा शब्द सामान्य असावा आणि "दुष्टपणा" आणि "वाईट" या शब्दांपेक्षा वेगळा असावा.

(हे सुद्धा पहा: अवज्ञा, वाईट, देह, जकातदार

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 03:15 देव बोलला, “मी वचन देतो येथूने पुढे मानवाच्या दुष्टाईमुळे भूमीला कधीही शाप देणार नाही, व पाण्याने जगाचा नाश करणार नाही, कारण मानव बाळपणापासुन पापी असतात.”
  • 13:12 त्यांच्या पापामुळे देवाला त्यांचा भयंकर राग आला व त्याने त्यांचा नाश करावयाचे ठरविले.
  • 20:01 इस्त्रायलाचे राज्य व यहूदाचे राज्य या दोहोंनीही देवाविरुध्द पाप केले. ‌‌‌देवाने त्यांच्याशी सिनाय पर्वतावर केलेला करार त्यांनी तोडला.
  • 21:13 संदेष्टयांनी हेही सांगितले की मसिहा परिपूर्ण व निष्पाप असेल. तो सर्व लोकांच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून मरेल.
  • 35:01 एके दिवशी, त्याचे ऐकण्यास जमलेल्या अनेक जकातदार व पापी लोकांस येशू शिकवीत होता.
  • 38:05 मग येशूने एक प्याला घेऊन म्हटले, ह्यातुन प्या. हा माझे नव्या कराराचे रक्त आहे. ते अनेकांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे.
  • 43:11 पेत्र त्यांना म्हणाला, "तुम्हांपैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चाताप करुन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हास तुमच्या पापांची क्षमा करील.
  • 48:08 आम्ही आमच्या पापांमुळे मरणदंडास पात्र आहोत!
  • 49:17 जरी आपण ख्रिस्ती आहात, तरी आपल्याला पाप करण्याचा मोह होऊ शकतो. परंतु देव विश्वासू आहे आणि म्हणतो की जर आपण आपल्या पापांचा स्वीकार केला, तर तो आपणांस क्षमा करील. पापाविरूद्ध लढण्यासाठी तो आम्हास शक्ति देईल.

Strong's

  • Strong's: H817, H819, H2398, H2399, H2400, H2401, H2402, H2403, H2408, H2409, H5771, H6588, H7683, H7686, G264, G265, G266, G268, G361, G3781, G3900, G4258