mr_tw/bible/kt/evil.md

6.9 KiB
Raw Blame History

वाईट, दुष्ट, दुष्टाई

व्याख्या:

"वाईट" आणि "दुष्ट" या दोन्ही शब्दांचा संदर्भ, असे काही जे देवाच्या पवित्र चारित्र्याला आणि इच्छेला विरोध करते.

  • जिथे "वाईट" हा शब्द एखाद्या व्यक्तीचे वर्णन करतो, तिथे "दुष्ट" हा शब्द व्यक्तीच्या स्वभावाचे वर्णन करतो. तथापि, दोन्ही संज्ञाच्या अर्थामध्ये खूपच साम्य आहे.
  • "दुष्टाई" या शब्दाचा अर्थ लोक जेव्हा वाईट गोष्टी करतात तेव्हा अस्तित्वात असण्याची स्थिती होय.
  • वाईटाचा परिणाम कसे लोक दुसऱ्या लोकांना मारून, चोरी करून, निंदा करून, आणि क्रूर व निर्दयी होऊन त्यांच्याशी वाईट वागतात ह्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतात.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, "वाईट" आणि "दुष्ट" या शब्दाचे भाषांतर "वाईट" किंवा "पापमय" किंवा "अनैतिक" असे केले जाऊ शकते.
  • याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "चांगले नसलेला" किंवा "नीतिमान नसलेला" किंवा "नैतिक नसलेला" या शब्दांचा समावेश होतो.
  • या संज्ञा भाषांतरित करण्यासाठी वापरले गेलेले शब्द किंवा वाक्यांश, लक्ष्य भाषेमध्ये स्वाभाविक असलेल्या संदर्भासह जुळतात याची खात्री करा.

(हे सुद्धा पहा: अवज्ञा, पाप, चांगले, नीतिमान, भूत)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 02:04 "देवाला ठाऊक आहे की हे फळ खाल्ल्यानंतर, तुम्हास त्याच्या प्रमाणेच बऱ्या वाईटाचे ज्ञान होईल.”
  • 03:01 बऱ्याच वर्षानंतर, पृथ्वीवर खूप लोकवस्ती वाढली. लोक खूपच दुष्ट व हिंसाचारी होत गेले.
  • 03:02 परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. पृथ्वीवरील दुष्ट लोकांमध्ये राहणारा हा एक न्यायी पुरुष होता.
  • 04:02 देव बोलला अशा प्रकारे दुष्टाई करण्यासाठी ते एकत्र काम करतील, तर ते अजून अधिक दुष्ट कृत्ये करतील.
  • 08:12 तुम्ही मला गुलाम म्हणून विकून माझे वाईट करण्याचा प्रयत्न केला, पण देवाने त्याच वाईटाचा माझे चांगले करण्यासाठी उपयोग केला!
  • 14:02 ते खोट्या देवदवतांची पुजा करीत होते व पुष्कळ वाईट गोष्टी करीत होते.
  • 17:01 परंतु नंतर तो एक दुष्ट राजा बनला व त्याने देवाची आज्ञा मानली नाही, म्हणून देवाने त्याच्या जागी राज्य करण्यासाठी दुस-या मनुष्यास नेमले.
  • 18:11 इ‌स्त्रायलाच्या नवीन राज्यामध्ये, सर्वच राजे दुष्ट होते.
  • 29:08 राजाला त्याचा खूप राग आला व त्याने त्याचे सर्व देणे फेडीपर्यंत त्याला तुरुंगात टाकले.
  • 45:02 ते म्हणाले, "आम्ही त्यास मोशे व देवाविषयी अपशब्द बोलतांना ऐकले आहे!"
  • 50:17 तो त्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील व त्या ठिकाणी कुठलाही त्रास, शोक, रडणे, दुष्टाई, दुःख किंवा मृत्यु नसेल.

Strong's

  • Strong's: H205, H605, H1100, H1681, H1942, H2154, H2162, H2617, H3415, H4209, H4849, H5753, H5766, H5767, H5999, H6001, H6090, H7451, H7455, H7489, H7561, H7562, H7563, H7564, G92, G113, G459, G932, G987, G988, G1426, G2549, G2551, G2554, G2555, G2556, G2557, G2559, G2560, G2635, G2636, G4151, G4189, G4190, G4191, G5337