mr_tw/bible/kt/righteous.md

12 KiB

नीतीमान, नितीमत्व (प्रामाणिकपणा), अनीतीमान, अनीती, सरळ योग्य

व्याख्या:

"नीतीमत्त्व" या शब्दाचा संदर्भ, देवाचा परिपूर्ण चांगुलपणा, न्याय, विश्वास आणि प्रेम यांच्याशी आहे. हे गुण असल्यामुळे देव "नीतीमान" बनतो. देव नीतीमान आहे म्हणून, त्याने पापाला दोष लावणे आवश्यक आहे.

  • या संज्ञा बहुतेकदा त्या व्यक्तीचे वर्णन करतात जी देवाच्या आज्ञा पाळते आणि नैतिकरित्या चांगली आहे. तथापि, देव वगळता कोणीही पूर्णपणे नीतीमान नाही, कारण सर्व लोकांनी पाप केले आहे.
  • उदाहरणार्थ: पवित्र शास्त्रामधील लोक, ज्यांना "नीतीमान" म्हंटले गेले त्यामध्ये नोहा, ईयोब, अब्राहाम, जखऱ्या व अलीशिबा यांचा समावेश आहे.
  • जेव्हा लोक त्यांच्या तारणासाठी येशूवर विश्वास ठेवतात, तेव्हा देव त्यांना त्यांच्या पापांपासून शुद्ध करतो आणि येशूच्या नितीमत्वामुळे त्यांना नीतिमान ठरवतो.

"अनीतीमान" या शब्दाचा अर्थ पापी आणि नैतिकरित्या भ्रष्ट असा आहे. "अनीती" या शब्दाचा संदर्भ पाप किंवा पापमय स्थितीशी आहे.

  • या साज्ञांचा संदर्भ विशेषत: देवाच्या शिकवणुकीचे आणि आज्ञांचे पालन न करणाऱ्या मार्गाने जीवन जगण्याशी आहे.
  • अनीतिमान लोक त्यांच्या विचार व कृतींमध्ये अनैतिक असतात.
  • काहीवेळा "अनीतिमान लोक" या शब्दाचा संदर्भ ज्यांचा विशेषकरून येशूवर विश्वास नाही अशा लोकांशी आहे.

"सरळ" आणि "योग्य" या शब्दांचा संदर्भ, देवाच्या नियमांचे पालन करणाऱ्या मार्गावर चालनाऱ्याशी आहे.

  • या शब्दांच्या अर्थामध्ये सरळ उभे राहण्याच्या आणि थेट पुढे बघण्याच्या कल्पनांचा समावेश आहे.
  • जो "सरळ" आहे तो असा आहे जो देवाच्या नियमांचे पालन करतो आणि त्याच्या इच्छेविरूद्ध असलेल्या गोष्टी करत नाही.
  • "अखंडत्व" आणि "नीतिमान" यासारख्या शब्दांचे अर्थ समान आहेत आणि काहीवेळा "अखंडत्व आणि नितीमत्व " यासारख्या समांतर रचनांमध्ये वापरली जातात. (पहा: समांतरवाद

भाषांतर सूचना

  • जेव्हा ते ईश्वराचे वर्णन करतात, तेव्हा "नीतिमान" या शब्दाचे भाषांतर "पूर्णतः चांगले आणि न्यायी" किंवा "नेहमी योग्य रीतीने वागनारा" असे केले जाऊ शकते.
  • देवाचे "नीतिमत्त्व" या शब्दाचे भाषांतर "परिपूर्ण विश्वासूपणा व चांगुलपणा" असे देखील केले जाऊ शकते.
  • जेव्हा ते देवाला आज्ञाधारक असणारे लोक असे वर्णन करते तेव्हा "नीतिमान" या शब्दाचे भाषांतर "नैतिकरित्या चांगले" किंवा "न्यायी" किंवा "देवाला प्रसन्न करणारे जीवन जगणारे" असे केले जाऊ शकते.
  • "नीतिमान" हा वाक्यांशाचे भाषांतर "नीतिमान लोक" किंवा "देवभिरू लोक" असे देखील केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "नीतिमत्त्व" या शब्दाचे भाषांतर "कृपा" किंवा "देवासमोर परिपूर्ण असणे" किंवा "ईश्वराचे आज्ञा मानून योग्य मार्गाने कार्य करणारे" किंवा "उत्तम प्रकारे करत आहे" असे केले जाऊ शकते.
  • काहीवेळा "नीतिमान" हा शब्द लाक्षणिक अर्थाने "आम्ही चांगले आहोत असा विचार करणारे लोक" किंवा "असे वाटते की लोक नीतिमान आहेत" ह्याच्या संदर्भासाठी सुद्धा वापरतात.
  • "अनीतिमान" या शब्दाचे भाषांतर "नीतिमान नसलेला" असे करणे सहज शक्य आहे.
  • संदर्भाच्या आधारावर, या शब्दाचे भाषांतर "दुष्ट" किंवा "अनैतिक" किंवा "देव विरुद्ध बंड करणारे लोक" किंवा "पापमय" अशा इतर मार्गांनी केले जाऊ शकते.
  • "अनीतिमान" हा शब्द "अनीतीमान लोक" म्हणून भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • "अनीती" या शब्दाचे भाषांतर "पाप" किंवा "वाईट विचार आणि कृती" किंवा "दुष्टता" असे होऊ शकते .
  • शक्य असल्यास, "नीतिमान, नीतिमत्त्व" यांच्याशी त्याचा संबंध दर्शविणाऱ्या मार्गाने हे भाषांतर करणे सर्वोत्तम आहे.
  • "सरळ" या शब्दाचे भाषांतर "यथायोग्य कार्य करणारे" किंवा "असा व्यक्ती जो यथायोग्य कार्य करतो" किंवा "देवाच्या नियमांचे पालन करणारा" किंवा "देवाच्या आज्ञा मानणारे" किंवा "योग्य मार्गाने वागणे" अशा मार्गांनी केले जाऊ शकते.
  • "योग्य" या शब्दाचे भाषांतर "नैतिक शुद्धता" किंवा "चांगले नैतिक आचरण" किंवा "यथार्थ" असे केले जाऊ शकते.
  • "सरळ" या वाक्यांशाचे भाषांतर "लोक जे सरळ आहेत" किंवा "सरळ लोक" असे केले जाऊ शकते.

[हे सुद्धा पहा: वाईट, विश्वासू, चांगले, पवित्र, अखंडत्व, नियम, कायदा, आज्ञाधारक, शुद्ध नीतिमान पाप ](../kt/sin.md), बेकायदेशीर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 03:02 परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. पृथ्वीवरील दुष्ट लोकांमध्ये राहणारा हा एक न्यायी पुरुष होता.
  • 04:08 देवावर ठेवलेल्या विश्वासामुळे देवाने अब्रामाला नितिमान ठरवले.
  • 17:02 दाविद हा देवाचे भय बाळगणारा नम्र व धार्मिक पुरुष होता.
  • 23:01 मरीयेचे वाग्दान योसेफ नावाच्या एका धार्मिक पुरुषाबरोबर झाले होते.
  • 50:10 तेव्हा आपल्या पित्याच्या राज्यात नीतिमान सूर्याप्रमाणे प्रकाशतील."

Strong's

  • Strong's: H205, H1368, H2555, H3072, H3474, H3476, H3477, H3483, H4334, H4339, H4749, H5228, H5229, H5324, H5765, H5766, H5767, H5977, H6662, H6663, H6664, H6665, H6666, H6968, H8535, H8537, H8549, H8552, G93, G94, G458, G1341, G1342, G1343, G1344, G1345, G1346, G2118, G3716, G3717