mr_tw/bible/other/obey.md

5.9 KiB

आज्ञा मानणे, आज्ञाधारक (ऐकणारा), आज्ञा पाळल्या, पाळणे, आज्ञाधारक, आज्ञाधारकपणे, अवज्ञा करणे, न ऐकणारा, अवज्ञा केली, आज्ञाभांगामुळे, आज्ञाभंग

व्याख्या:

"आज्ञा मानणे" ह्याचा अर्थ जे गरजेचे आहे ते किंवा जी आज्ञा केली आहे ते करणे. "आज्ञाधारक" हा शब्द कोणीएक जो आज्ञा पाळतो त्याचे वर्णन करतो. आज्ञाधारक व्यक्तीकडे "आज्ञाधारकता" ही एक विशेषता आहे. काहीवेळा अशी आज्ञा की एखादी गोष्ट करू नका, जसे की "चोरी करू नका" या वाक्यामध्ये.

  • सामान्यत: "आज्ञा" या शब्दाचा उपयोग प्राधिकरणाच्या एखाद्या व्यक्तीच्या आज्ञा किंवा कायद्यांचे पालन करण्याच्या संदर्भात केला जातो.
  • उदाहरणार्थ, लोक कायद्याचे पालन करतात, जे देश, राज्य किंवा इतर संघटनेच्या नेत्यांनी तयार केले आहेत.
  • मुले त्यांच्या पालकांच्या आज्ञेत असतात, दास त्यांच्या धन्याच्या आज्ञेत असतात, लोक त्यांच्या देवाच्या आज्ञेत असतात, आणि नागरिक त्यांच्या देशाच्या कायद्यांच्या आज्ञेत असतात.
  • जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याने, लोकांना काही काम न करण्याचा आदेश दिला, तेव्हा ते तसे न करता त्यानुसार वागतात.
  • "आज्ञा मानणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "ज्याची आज्ञा दिली आहे ते करणे" किंवा "हुकुमांचे अनुसरण करणे" किंवा "देवाने जे करण्यास सांगितले आहे ते करणे" या अर्थाच्या शब्दांचा किंवा वाक्यांशांचा समावेश होतो.
  • "आज्ञाधारक" या शब्दाचे भाषांतर "ज्याची आज्ञा दिली आहे ते करणे" किंवा "आज्ञेचे अनुसरण करणे" किंवा "देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे करणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: नागरिक, आदेश, अवज्ञा, सत्ता, कायदा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 03:04 नोहाने देवाची आज्ञा पाळली. देवाने त्याला जे सांगितले होते त्याप्रमाणे त्याने आणि त्याच्या तीन मुलांनी तारू बनविले.
  • 05:06 अब्राहाम पुन्हा देवाची आज्ञा मानतो व इसहाकाचे अर्पण करतो.
  • 05:10 तु माझी आज्ञा पाळलीस म्हणून तुझ्या संततीद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील.”
  • 05:10 परंतु मिस-यांनी देवावर विश्वास ठेवला नाही व त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत.
  • 13:07 जर त्यांनी हे सर्व नियम पाळले, तर देवाने त्यांना आशीर्वाद व संरक्षण देण्याचे अभिवचन दिले.

Strong's

  • Strong's: H1697, H2388, H3349, H4928, H6213, H7181, H8085, H8086, H8104, G191, G544, G3980, G3982, G4198, G5083, G5084, G5218, G5219, G5255, G5292, G5293, G5442