# वाईट, दुष्ट, दुष्टाई ## व्याख्या: "वाईट" आणि "दुष्ट" या दोन्ही शब्दांचा संदर्भ, असे काही जे देवाच्या पवित्र चारित्र्याला आणि इच्छेला विरोध करते. * जिथे "वाईट" हा शब्द एखाद्या व्यक्तीचे वर्णन करतो, तिथे "दुष्ट" हा शब्द व्यक्तीच्या स्वभावाचे वर्णन करतो. तथापि, दोन्ही संज्ञाच्या अर्थामध्ये खूपच साम्य आहे. * "दुष्टाई" या शब्दाचा अर्थ लोक जेव्हा वाईट गोष्टी करतात तेव्हा अस्तित्वात असण्याची स्थिती होय. * वाईटाचा परिणाम कसे लोक दुसऱ्या लोकांना मारून, चोरी करून, निंदा करून, आणि क्रूर व निर्दयी होऊन त्यांच्याशी वाईट वागतात ह्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतात. ## भाषांतर सूचना * संदर्भाच्या आधारावर, "वाईट" आणि "दुष्ट" या शब्दाचे भाषांतर "वाईट" किंवा "पापमय" किंवा "अनैतिक" असे केले जाऊ शकते. * याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "चांगले नसलेला" किंवा "नीतिमान नसलेला" किंवा "नैतिक नसलेला" या शब्दांचा समावेश होतो. * या संज्ञा भाषांतरित करण्यासाठी वापरले गेलेले शब्द किंवा वाक्यांश, लक्ष्य भाषेमध्ये स्वाभाविक असलेल्या संदर्भासह जुळतात याची खात्री करा. (हे सुद्धा पहा: [अवज्ञा](../other/disobey.md), [पाप](../kt/sin.md), [चांगले](../kt/good.md), [नीतिमान](../kt/righteous.md), [भूत](../kt/demon.md)) # पवित्र शास्त्रातील संदर्भ: * [1 शमुवेल 24:10-11](rc://mr/tn/help/1sa/24/10) * [1 तीमथी 06:9-10](rc://mr/tn/help/1ti/06/09) * [3 योहान 01:9-10](rc://mr/tn/help/3jn/01/09) * [उत्पत्ति 02:15-17](rc://mr/tn/help/gen/02/15) * [उत्पत्ति 06:5-6](rc://mr/tn/help/gen/06/05) * [ईयोब 01:1-3](rc://mr/tn/help/job/01/01) * [ईयोब 08:19-20](rc://mr/tn/help/job/08/19) * [शास्ते 09:55-57](rc://mr/tn/help/jdg/09/55) * [लुक 06:22-23](rc://mr/tn/help/luk/06/22) * [मत्तय 07:11-12](rc://mr/tn/help/mat/07/11) * [नीतिसूत्रे 03:7-8](rc://mr/tn/help/pro/03/07) * [स्तोत्र 022:16-17](rc://mr/tn/help/psa/022/016) ## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे: * __[02:04](rc://mr/tn/help/obs/02/04)__ "देवाला ठाऊक आहे की हे फळ खाल्ल्यानंतर, तुम्हास त्याच्या प्रमाणेच बऱ्या __वाईटाचे__ ज्ञान होईल.” * __[03:01](rc://mr/tn/help/obs/03/01)__ बऱ्याच वर्षानंतर, पृथ्वीवर खूप लोकवस्ती वाढली. लोक खूपच __दुष्ट__ व हिंसाचारी होत गेले. * __[03:02](rc://mr/tn/help/obs/03/02)__ परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. पृथ्वीवरील __दुष्ट__ लोकांमध्ये राहणारा हा एक न्यायी पुरुष होता. * __[04:02](rc://mr/tn/help/obs/04/02)__ देव बोलला अशा प्रकारे __दुष्टाई__ करण्यासाठी ते एकत्र काम करतील, तर ते अजून अधिक दुष्ट कृत्ये करतील. * __[08:12](rc://mr/tn/help/obs/08/12)__ तुम्ही मला गुलाम म्हणून विकून माझे __वाईट__ करण्याचा प्रयत्न केला, पण देवाने त्याच वाईटाचा माझे चांगले करण्यासाठी उपयोग केला! * __[14:02](rc://mr/tn/help/obs/14/02)__ ते खोट्या देवदवतांची पुजा करीत होते व पुष्कळ __वाईट__ गोष्टी करीत होते. * __[17:01](rc://mr/tn/help/obs/17/01)__ परंतु नंतर तो एक __दुष्ट__ राजा बनला व त्याने देवाची आज्ञा मानली नाही, म्हणून देवाने त्याच्या जागी राज्य करण्यासाठी दुस-या मनुष्यास नेमले. * __[18:11](rc://mr/tn/help/obs/18/11)__ इ‌स्त्रायलाच्या नवीन राज्यामध्ये, सर्वच राजे दुष्ट होते. * __[29:08](rc://mr/tn/help/obs/29/08)__ राजाला त्याचा खूप राग आला व त्याने त्याचे सर्व देणे फेडीपर्यंत त्याला तुरुंगात टाकले.’’ * __[45:02](rc://mr/tn/help/obs/45/02)__ ते म्हणाले, "आम्ही त्यास मोशे व देवाविषयी __अपशब्द__ बोलतांना ऐकले आहे!" * __[50:17](rc://mr/tn/help/obs/50/17)__ तो त्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील व त्या ठिकाणी कुठलाही त्रास, शोक, रडणे, __दुष्टाई__, दुःख किंवा मृत्यु नसेल. # Strong's * Strong's: H205, H605, H1100, H1681, H1942, H2154, H2162, H2617, H3415, H4209, H4849, H5753, H5766, H5767, H5999, H6001, H6090, H7451, H7455, H7489, H7561, H7562, H7563, H7564, G92, G113, G459, G932, G987, G988, G1426, G2549, G2551, G2554, G2555, G2556, G2557, G2559, G2560, G2635, G2636, G4151, G4189, G4190, G4191, G5337