mr_tw/bible/kt/true.md

7.9 KiB
Raw Blame History

खरा, सत्य,

व्याख्या:

"सत्य" या शब्दाचा संदर्भ एक किंवा त्यापेक्षा जास्त संकल्पना आहेत, ज्या वस्तुस्थिती आहेत, ज्या घटना घडल्या आहेत त्या, आणि विधाने जी प्रत्यक्षात सांगितली गेली. अशा संकल्पनांना "खरे" म्हंटले जाते.

  • खऱ्या गोष्टी वास्तविक, अस्सल, प्रत्यक्ष, रास्त, वैध आणि तथ्यवाचक असतात.
  • सत्य म्हणजे एक समज, विश्वास, तथ्य किंवा विधान जे सत्य आहे.
  • एक भविष्यवाणी "खरी झाली" किंवा "खरी ठरेल" असे म्हणण्याचा अर्थ असा होतो की, जसे भाकीत केले होते प्रत्यक्षात तसेच घडले आहे किंवा ते अशा पद्धतीने होईल.
  • सत्यामध्ये विश्वसनीय आणि विश्वासू अशा पद्धतीने कार्य करण्याची संकल्पना समाविष्ट आहे.
  • येशूने जे शब्द सांगितले त्यांनी देवाचे सत्य प्रगत केले.
  • देवाचा शब्द सत्य आहे. हे आपल्याला ज्या गोष्टी प्रत्यक्षात घडल्या त्याबद्दल सांगते आणि देवाबद्दल जे काही खर आहे आणि त्याने जे काही बनवलं त्याबद्दल आपल्याला शिकवते.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर आणि ज्याचे वर्णन करण्यात आले आहे, "खरा" या शब्दाचे भाषांतर "वास्तविक" किंवा "वस्तुस्थिती" किंवा "बरोबर" किंवा "योग्य" किंवा "निश्चित" किंवा "अस्सल" असे देखील केले जाऊ शकते.
  • "सत्य" याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "जे काही खर आहे" किंवा "तथ्य" किंवा "निश्चितता" किंवा "तत्व" यांचा समावेश होतो.
  • "खरे होणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "प्रत्यक्षात घडलेले" किंवा "पूर्ण झालेले" किंवा "जसे भाकीत केले तसे घडले" असे केले जाऊ शकते.
  • "सत्य सांगणे" किंवा "सत्य बोलणे" या अभिव्यक्तीचे भाषांतर "जे काही खर आहे ते सांगणे" किंवा "जे प्रत्यक्षात घडले होते ते सांगणे" किंवा "अशा गोष्टी सांगणे ज्या विश्वसनीय आहेत" असे केले जाऊ शकते.
  • "सत्य ग्रहण करणे" याचे भाषांतर "देवाबद्दल जे खर आहे त्यावर विश्वास ठेवणे" असे केले जाऊ शकते.
  • "देवाची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करा" या अभिव्यक्तीमध्ये "खरेपणाने" याचे भाषांतर "जे देवाने आपल्याला शिकवले आहे त्याचे विश्वासाने आज्ञापालन करणे" असे देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: विश्वास, विश्वासू, पूर्ण, आज्ञाधारक, संदेष्टा, समजून घेणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 02:04 सापाने स्त्रीस म्हटले, “हे खोटे आहे ! तुम्ही खरोखर मरणार नाही.
  • 14:06 लगेच कालेब आणि यहोशवा हे दोघे हेर म्हणाले, "कनानी लोक उंच व बलाढ्य आहेत ही गोष्ट खरी आहे, परंतु आपण त्यांचा निश्चितपणे पराभव करु शकतो.
  • 16:01 इस्राएली लोक खरं देव, यहोवा ऐवजी कनानी देवतांची उपासना करू लागले
  • 31:08 त्यांनी येशूला नमन केले व म्हणाले, ‘‘तू खरोखर, देवाचा पूत्र आहेस.
  • 39:10 मी या पृथ्वीवर देवाविषयीचे सत्य सांगण्यास आलो आहे. सत्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण माझे ऐकतो’’ पिलाताने विचारले, सत्य काय आहे?

Strong's

  • Strong's: H199, H389, H403, H529, H530, H543, H544, H551, H571, H935, H3321, H3330, H6237, H6656, H6965, H7187, H7189, G225, G226, G227, G228, G230, G1103, G3303, G3483, G3689, G4103, G4137