mr_tw/bible/kt/arkofthecovenant.md

3.3 KiB

कराराचा कोश, याहोवाचा (देवाचा) कोश

व्याख्या:

या शब्दांमध्ये एक विशेष लाकडी पेटीचा संदर्भ पहायला मिळतो, जी सोन्याने मढवलेली होती. यामध्ये दोन दगडी पाट्या होत्या ज्यावर दहा आज्ञा लिहिल्या होत्या. त्यात अहरोनाची काठी आणि मन्नाचे भांडे देखील होते.

  • "कोश" हा शब्द येथे "पेटी" किंवा "मोठी पेटी" किंवा "पात्र" म्हणून भाषांतरित केला जाऊ शकतो.
  • या पेटीतील वस्तूंनी इस्राएलांना परमेश्वराने त्यांच्यासोबत केलेल्या कराराची आठवण करून दिली.
  • कराराचा कोश "अतिपवित्र स्थानात" मध्ये स्थित होता.
  • निवास मंडपाच्या अतिपवित्र स्थानी असलेल्या कराराच्या कोशावर परमेश्वराची उपस्थिती होती, तेथून परमेश्वर इस्राएली लोकांसाठी मोशे बरोबर बोलत होता.
  • त्या काळादरम्यान, कराराचा कोश मंदिराच्या अतिपवित्र स्थानी होता. दरवर्षी वर्षातून एकदा, प्रायश्चित्ताच्या दिवशी महायाजक कोशाजवळ जात होता.
  • बऱ्याच इंग्रजी आवृत्त्यांमध्ये "कराराची आज्ञा" याचा शब्दशः अर्थ "साक्ष" म्हणून भाषांतरित केला आहे. याचा अर्थ असा होतो की दहा आज्ञा आपल्या लोकांबरोबर देवाने दिलेल्या कराराची साक्षी होती किंवा साक्ष होती. हा "कराराचा कायदा" म्हणूनही भाषांतरित केला जातो.

(हेही पहा: कोश, करार, प्रायश्चित्त, पवित्र स्थान, साक्ष)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H727, H1285, H3068